scorecardresearch

मुलांनी चक्क बुरखा घालून केला भन्नाट डान्स; Video व्हायरल होताच कॉलेजने केली कारवाई

विद्यार्थ्यांचा डान्स करण्याचा अंदाज अनेकांना आवडला असून हा डान्स पाहणारे मोठमोठ्याने हसताना दिसतं आहेत

मुलांनी चक्क बुरखा घालून केला भन्नाट डान्स; Video व्हायरल होताच कॉलेजने केली कारवाई
इंजिनीअरिंग कॉलेजमधील मुलांनी बुरखा घालून डान्स केल्याचा Video व्हायरल. (Photo : Twitter)

बुरखा घालून डान्स करणाऱ्या काही मुलांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र बुरखा घालून डान्स करणं या मुलांचा चांगलचं महागात पडलं असून त्यांना काही काळासाठी महाविद्यालयातून निलंबित करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. या घटनेची माहीती डीएनए हिंदी या वृत्तवाहिनीने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील एका इंजिनीअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील कार्यक्रमात बुरखा घालून डान्स केला होता. या मुलांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही विद्यार्थी सलमान खानच्या दबंग चित्रपटातील ‘मेरी फोटो को सीने से यार…’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या विद्यार्थ्यांचा डान्स करण्याचा अंदाज अनेकांना आवडला असून हा डान्स पाहणारे मोठमोठ्याने हसताना व्हिडीओमध्ये दिसतं आहेत.

मात्र, हा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा मात्र काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतल्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं आहे. तर हा व्हिडिओ विद्यार्थी संघटनेच्या एका अनौपचारिक कार्यक्रमातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तर हा डान्स कार्यक्रमाचा भाग नव्हता शिवाय आमचे कॉलेज समाजातील एकोपा बिघडवणाऱ्या उपक्रमांना समर्थन देत नसल्याचं कॉलेजच्या प्राचार्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही पाहा- महिलांचा करेक्ट कार्यक्रम! भलेमोठे गवताचे बंडल रोबोप्रमाणे क्षणात लोकलमध्ये चढवले; Video पाहून व्हाल थक्क

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ @your_nakshab नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, ‘कर्नाटकातील मंगळुरू अभियांत्रिकी महाविद्यालयात काही विद्यार्थी बुरख्या घालून नाचताना दिसतं आहेत. या घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 13:14 IST

संबंधित बातम्या