काही दिवसांपूर्वीच शाही पनीर आणि पनीर टिक्का यांना जगातील सर्वोत्त्कृष्ट १० पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले होते तर इतर पनीरच्या खाद्यपदार्थांनी सर्वोत्कृष्ट ५० च्या यादीत स्थान मिळवले आहे. आता सर्वोत्कृष्ट पारंपारिक शाकाहारी (व्हेगन) पदार्थांमुळे भारतीय खाद्यसंस्कृतीवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला जात आहे. टेस्ट अॅटलस या फूड गाइड प्लॅटफॉर्मने नुकतीच क्रमवारी जाहीर केली.

या यादीमध्ये टॉप 10 मध्ये परदेशी पदार्थांचे वर्चस्व असले तरी ११ वे स्थान भारतातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध मिसळ पावने पटकावले आहे.

महाराष्ट्राच्या प्रसिद्ध मिसळपावने जगात मिळवली ओळख

ज्यांना माहित नाही की मिसळ पाव काय आहे त्यांच्या माहितीकरिता, मिसळ म्हणजे तर्री असलेला झणझणीत रस्सा, जो चिवडा अथवा फरसान आणि पावासोबत एकत्रितपणे खाल्ले जाते. त्यावर बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर देखील वापरली जाते. मिसळसाठची मसालेदार तर्री तयार करण्याकरिता सामान्यत: मटकीचा वापर केला जातो. पाव हा एक प्रकारचा ब्रेड आहे जो भारताच्या पश्चिमेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, जो सामान्यतः मिसळसोबत खाल्ला जातो.

मिसळ पावाचे अनेक प्रकार आहेत कारण त्यातील घटक ठिकाणानुसार बदलू शकतात. पुणेरी मिसळ, कोल्हापूरी खान्देशी मिसळ, नाशिक मिसळ आणि अहमदनगर मिसळ असू शकते. 2015 मध्ये, लंडनमधील फूडी हब अवॉर्ड्समध्ये याला जगातील सर्वात चवदार शाकाहारी डिश म्हणून नाव देण्यात आले होते.

हेही वाचा – सोया पनीरची स्वादिष्ट भाजी खाऊन पाहा, नॉन-व्हेजची चव विसराल, जाणून घ्या सोपी रेसिपी

सर्वोत्कृष्ट पारंपारिक शाकाहारी पदार्थांच्या यादीत ७ भारतीय पदार्थांचा समावेश

हा यादीत स्थान मिळवणारा मिसळ एकमेव भारतीय पदार्थ नव्हता. एका लोकप्रिय फूड गाईडने प्रसिद्ध केलेल्या ५० सर्वोत्कृष्ट पारंपारिक शाकाहारी पदार्थांच्या यादीत एकूण ७ भारतीय स्वादिष्ट पदार्थांचा समावेश झाला आहे. मिसळसोबतच आलू गोबीने २०वे स्थान पटकावले, २२ व्या स्थानावर राजमा आणि२४ व्या स्थानावर गोबी मंचुरियनने स्थान मिळवले आहे. राजमा चावल हा वेगळा पदार्थ मानला गेला आणि ४१ व्या स्थानावर आहे.

तामिळनाडूच्या या पदार्थांने देखील मिळवले स्थान

मसाला वडा या भारतीय खाद्यपदार्थाला या यादीमध्ये २७ वा क्रमांक मिळाला आहे.टेस्ट अॅटलसने नमूद केले की, हा विशिष्ट नाश्ता तामिळनाडूचा आहे, परंतु इतर आवृत्त्या अस्तित्वात असल्याचे देखील स्पष्ट केले. “हा पदार्थ चहाच्या वेळेचा नाश्ता म्हणून खाल्ला जातो. मसाला वडा हा सहसा चना डाळ, कांदे, आले, कढीपत्ता, एका जीरे, वाळलेल्या लाल गरम मिरी, तेल आणि मीठ यांच्या मिश्रणाने तयार केला जातो,” वेबसाइटने म्हटले आहे. हे परिप्पू वडा सारखेच आहे, जे केरळमधील एक मसालेदार आणि कुरकुरीत स्नॅक जे समान साहित्य वापरून बनवले जाते.

हेही वाचा : घरगुती पदार्थ खाण्याची इच्छा होतेय? झटपट बनवा वडीचे सांबर, जाणून घ्या रेसिपी

महाराष्ट्रातून फक्त मिसळ नव्हे तर भेळपूरीने देखील मारली बाजी

मिसळपावला मिळालेल्या नव्या ओळखीमुळे तुम्ही आधीच आनंदित असाल तर तुमच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. लोकप्रिय स्ट्रीट फूड भेळ पुरीने देखील टॉप ५० मध्ये स्थान मिळवले असून आणि ३७ व्या स्थानावर कब्जा केला आहे. भेळ पुरी हा चाट पदार्थ मानला जातो आणि ज्यात कुरमुरा, कांदा, टोमॅटो, बटाटे, शेंगदाणे, शेव इत्यादी गोड आणि मसालेदार चटण्या मिसळून बनवला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे देशी पदार्थ देखील शाकाहारी (व्हेगन) आहेत हे तुम्हाला कधी लक्षात आले आहे का? आम्हाला नक्की कळवा