पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेश दौऱ्याच्या पहिल्या दिवशी केलेल्या भाषणामधील एका वाक्यावरुन भारतीय सोशल मीडिया चांगलच ढवळून निघालं आहे. १९७१ साली बांगलादेशच्या स्वांतत्र्यासाठी मी सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो आणि मला अटकही झाली होती असं मोदी  बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये दिलेल्या भाषणात म्हणाले. मोदींच्या याच वक्तव्यावरुन मोदी समर्थक आणि विरोधक आमने सामने आलेत. मोदींच्या या वक्तव्यावरुन अनेक मिम्सही तयार केले जात आहे. यामध्ये मोदींवर अनेकदा टीका करणारी सॅण्डअप कॉमेडी सादर करणाऱ्या कुणाल कामरानेही उडी घेत मोदींना टोला लगावणारं एक खोचक ट्विट केलं आहे.

नक्की वाचा >> “फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून राज्यपालांना फोन करून विचारतात…,” कुणाल कामराचं खोचक ट्विट

मोदी विरोधकांनी पंतप्रधानांनी बांगलादेशमध्ये केलेला सत्याग्रह आंदोलनाचा दावा खोटा असल्याचं सांगत मोदींवर उपहासात्मक पद्धतीने टीका सुरु केली आहे. अगदी अमेरिकाचा शोध लागण्यापासून ते पहिलं, दुसरं महायुद्धामध्येही मोदींचा सहभाग असल्याचे उपहासात्मक ट्विट आणि मिम्स व्हायरल केले जात आहेत. अनेक मिम्समधून मोदींना स्वत:चं कौतुक करायला आवडतं असं सुचित करण्याचा प्रयत्न केला जातोय.

नक्की वाचा >> RTI अर्ज दाखल : मोदींना १९७१ साली कोणत्या कायद्याअंतर्गत अटक झाली?, त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवलं होतं?

मोदींवर होणाऱ्या या टीकेच्या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने मोजक्या शब्दांमध्ये मोदींवर निशाणा साधलाय. मोदीजी हे भारताला लाभलेलं सर्वोत्तम जागतिक नेते आहेत असं नरेंद्र मोदी म्हणालेत, अशा अर्थाचं ट्विट कुणाल कामराने केलं आहे. हे ट्विट व्हायरल झालं असून चार हजारहून अधिक जणांनी हे रिट्विट केलं आहे तर ४० हजारहून अधिक जणांनी हे ट्विट लाईक केलं आहे.


काही दिवसांपूर्वीच फडणवीसांवर साधला होता निशाणा

नक्की वाचा >> सर्व भारतीय बांगलादेशच्या निर्मितीच्या बाजूने होते तर मोदींना सत्याग्रह कशासाठी केला?; शिवसेना खासदाराचा प्रश्न

राज्यातील राजकीय घडामोडी, पोलीस बदल्यांचा घोटाळा, सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या शिष्टमंडळासहीत बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेतली होती. या भेटीनंतर कुणालने फडणवीसांवर निशणा साधला होता. “जर तुम्हाला आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये अपयश येत आहे असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की देवेंद्र फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून तयार होतात आणि राज्यपालांना फोन करुन विचारतात, मी पुन्हा येऊ का?”, असं ट्विट कामराने केलं होतं.

नक्की वाचा >> मोदींनी खरंच घेतला होता बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग?; समोर आला ‘हा’ पुरावा

२०१९ साली महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. अवघ्या काही दिवसांनंतर राजकीय घडामोडींमुळे अजित पवारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आणि फडणवीसांनी राजीनामा दिला. यामुळे सर्वात कमी कालावधीसाठी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला होता. पहाटेच्या या शपथविधीवरुन बराच राजकीय गोंधळ निर्माण झालेला. त्याचाच संदर्भ देत कुणाल कामराने फडणवीसांवर निशाणा साधला होता.