Mohammed Shami Look A Like Video : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी हा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अलीकडेच त्याला भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. यानंतर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोहम्मद शमी हा चर्चेचा विषय बनला आहे. पण, आता तो एका नव्या कारणामुळे चर्चेत येत आहे. हे कारण म्हणजे मोहम्मद शमीसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्याला पाहून मोहम्मद शमीचे चाहतेही गोंधळले आहेत. मोहम्मद शमीसारखी दिसणारी ही व्यक्ती एका टोलनाक्यावर उभी असल्याचे दिसतेय. त्याला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

या व्हिडीओमध्ये मोहम्मद शमीसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने लूक ग्रे जॅकेट आणि डोक्यावर कॅप घातलेली दिसत आहे. हा व्हिडीओ नागपूरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती स्वतः मोहम्मद शमीचा चाहता आहे. यावेळी व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने मोहम्मद शमीसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला एकदा सेम शमीसारखी बॉलिंग ॲक्शन करून दाखवण्याची विनंती केली, त्यानंतर त्याने त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण केली. हा व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे.

जगातील सर्वात वाईट पदार्थांच्या यादीत भारतातील ‘या’ भाजीचा समावेश; तुम्हाला आवडते का ही भाजी?

दरम्यान, एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) @RVCJ_FB नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

अनेक युजर्स आता व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, मला आधी वाटले की, त्याचा भाऊ अगदी त्याच्यासारखा दिसतो की काय; पण इथे आणखी एक आहे. दुसऱ्या युजरने लिहिले, घटस्फोटाचे प्रकरण याच्याकडे शिफ्ट करा. तिसऱ्या युजरने लिहिले, त्याला बॉलिंग करायला सांगा, मग मी मानतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकतेच मोहम्मद शमीला राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो त्याच्या आईसाठी लिहिलेल्या भावनिक पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत होता.