रेल्वे प्रवास हा अजिबात सोपा नाही. रेल्वे प्रवास करताना सतत जीव मुठीत घेऊन फिरावे लागते. नेहमी सतर्क राहावे लागले. आपली एक चूक आपल्याच जीवावर बेतू शकते. रेल्वे अपघाताच्या अनेक घटना चर्चेत येत असतात. अनेकदा लोक आपल्या चुकांमुळेच आपला जीव संकटात टाकतात. अनेकदा अपघाताचे व्हिडिओ देखील सोशल मिडिया व्हायरल होत असतात जे पाहून अंगावर काटा उभा राहतो. असाच एका रेल्वे अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये दिसते की, रेल्वे पोलिसांनी कशाप्रकारे माय-लेकराचा जीव वाचवला आहे. रेल्वे पोलिसांच्या प्रंसवधानामुळे त्यांचा जीव वाचवला आहे. व्हिडिओ पाहून रेल्वे पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक केले जात आहे.

रेल्वे पोलिसांच्या प्रंसगवधानामुळे वाचला माय-लेकराचा जीव

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते आहे की, रेल्वे स्थानकावर एक लोकल धावत आहे. रेल्वे पोलिस देखील रेल्वे स्थानकावरच उभे आहे. येणाऱ्या – जाणाऱ्या प्रवाशांवर त्याचे लक्ष आहे. तेवढ्यात रेल्वे स्थानकावर एक लहान मुलगा आणि त्याची आई स्थानकावरून सुटलेली लोकल पकडण्याचा प्रयत्न करत होते अन् दोघांचाही पाय घसरतो. दरवाज्याला पकडून ठेवल्याने दोघंही लोकलसह काही अंतरावर खेचले जातात. सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या रेल्वे पोलि‍सांचे माय-लेकराकडे लक्ष जाते आणि तातडीने पळत जाऊन ते दोघांनाही पटकन मागे खेचतात. रेल्वे पोलि‍सांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. रेल्वे पोलीस तेथे नसते तर आई-मुलगा दोघांनीही आपला जीव गमावला असता. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहत आहे.

हेही वाचा –“लालपरी नव्हे ही तर….”, Viral Video पाहून तुम्हीही कराल कलाकाराचे तोंडभरून कौतुक

येथे पाहा Viral Video

हेही वाचा –“जिंकलंस भावा!”, ‘मुकाबला मुकाबला’ गाण्यावर अफालतून नाचतेय ‘ही’ व्यक्ती! थेट प्रभु देवाला दिली टक्कर

नेटकऱ्यांनी केले रेल्वे पोलिसांचे तोंडभरून कौतुक

इंस्टाग्रामवर लय भारी नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “रेल्वे पोलि‍सांच्या प्रसंगावधानाने वाचले आई आणि मुलाचे प्राण! तसेच व्हिडीओच्या स्क्रिनवर हे आहेत खरे हिरो, दोन जीव वाचवणार्‍या या पोलीस जवानाला सलाम असा मजकूर लिहिलेला दिसत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओ पाहून हे लक्षात घ्यायला हवे की, रेल्वेने प्रवास करताना कधीही घाई करू नये. आपला जीव अत्यंत मौल्यवाना आहे. त्यामुळे नेहमी सावधिगीरी बाळगली पाहिजे.