Mother and Sons Dance Video Viral: डान्सला आजच्या काळात खूप महत्त्व आहे. भलेही तुम्हाला चांगले नाचता येत असो किंवा नसो, आपल्या सर्व चिंता काही वेळासाठी विसरून जाऊन काही वेळ गाण्याच्या तालावर थिरकण्याचा आनंद काही वेगळाच आहे. सोशल मीडियावर आजकाल कित्येक लोक डान्स व्हिडिओ पोस्ट करत असतात जे नेटकऱ्यांचे मनोरंजन करतात. अशाच एका भन्नाट डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. माय लेकांचा डान्स व्हिडिओ सर्वांचे मन जिंकत आहे. व्हिडीओमध्ये एका महिलेने तिच्या मुलांबरोबर जिमिक्की कमल या गाण्यावर डान्स केला आहे. काकूंचा डान्स पाहून नेटकरी चकीत झाले आहे.

काकूंनी लेकांबरोबर केला अप्रतिम डान्स

सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होतात पण मोजके व्हिडिओ असतात जे सर्वांचे मन जिंकतात. ‘जिमिक्की कमल’ गाण्यावर लेकांबरोबर नाचणाऱ्या काकूंचा हा व्हिडिओ असाच आहे. व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमामध्ये काकू आपल्या लेकांबरोबर स्टेजवर नाचताना दिसत आहे. काकू पदर खोचून मुलांबरोबर थिरकत आहे. अगदी अचूकपणे त्या सर्व डान्स स्टेप करत आहे. एवढंच नाही त्यांचे हावभाव देखील अप्रतिम आहे. काकूंची ऊर्जा त्यांच्या मुलांपेक्षा जास्त आहे. नेटकऱ्यांना काकूंची डान्स खूप आवडला आहे. व्हिडिओ इंस्टाग्रामवर filmelon’s आणि appkalakaars’s पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओवर मजकूरमध्ये लिहिले आहे की, जिमिक्की कमल गाण्यावर या आईने तिच्या मुलांबरोबर अफलातून डान्स केला आहे आणि त्यांची ऊर्जा आणि स्वॅग कमाल आहे.”

नेटकऱ्यांना आवडला काकूचं डान्स

व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी काकूंचे कौतुक केले आहे. एकाने कमेंट केली की, “काकूंची बाजी मारली.”

“प्रत्येक मुलीला हवी असते अशी Chill सासू”अशी कमेंट एकाने केली.

तिसर्‍याने कमेंट केली की, “माझे डोळे काकूंच्या डान्सवरून दुसरीकडे जात नव्हते. व्वा, काय डान्स केला काकू.”

चौथ्याने कमेंट केला की, काकूंची ऊर्जा आणि स्वॅग खूप कमाल आहे, काकूंनी बाजी मारली.”

पाचव्याने कमेंट केली,”आई आणि तिच्या मुलांना इतक्या अविश्वसनीय ऊर्जेसाठी सलाम!

चौथ्याने लिहिले, “दिल खुश कर दिया” ( डान्स पाहून मनाला खूप आनंद झाला.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जिमिक्की कमल’ गाणे

जिमिक्की कमल” हे मल्याळम गाणे मोहनलाल अभिनीत “वेलीपडिंटे पुस्तकम” चित्रपटातील आहे. हे गाणे अनिल पनाचूरन यांनी लिहिले आहे तर विनीत श्रीनिवासन आणि रंजित उन्नी यांनी गायले आहे. शान रहमान यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. जिमिक्की कमल हे गाणे मुळत: एक लोकगीत आहे जे हरवलेल्या कानातल्यावरून नवरा-बायकोमध्ये सुरू असलेल्या भांडणावर आधारित आहे.