Baby Elephant Rescue From Manhole : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एक व्हिडीओ बराच चर्चेत आलाय. यातून आईच्या मायेची प्रचिती येते. एका हत्तीणीचं पिल्लू मॅनहोलमध्ये पडलेलं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आपल्या पिल्लाला मॅनहोलमध्ये पडलेलं पाहून हत्तीणीला धक्का बसतो आणि ती बेशुद्ध होऊन पडली. त्यानंतर पशुवैद्यकीय आणि राष्ट्रीय उद्यान अधिकाऱ्यांनी सीपीआर करून त्या हत्तीणीचा जीव वाचवला. तिच्या पिल्लाला सुद्धा मॅनहोलमधून बाहेर काढण्यात यशस्वी झाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ थायलंडमधला आहे. सीबीएस न्यूजनुसार, थायलंडच्या नाखोन नायोक प्रांतात बुधवारी ही घटना घडली. एक हत्तीचे पिल्लू एका नाल्यात घसरले होते. हे पिल्लू मॅनहोलमध्ये पडल्यानंतर जोरजोरात ओडरडून मदतीसाठी हाक मारत होते. म्हणतात ना आई ती शेवटी आईच असते…प्राण्यांच्या बाबतीतही अगदी असंच असतं. माणूस असो वा प्राणी…आईच्या मायेला कशाचीच तोड नाही. आपल्या पिल्लाला मॅनहोलमध्ये पडलेलं पाहून हत्तीणीचा जीव कासावीस होतो आणि त्याच्या मदतीसाठी धडपड करू लागते. एका वाटसरूने हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर पशुवैद्यकीय आणि राष्ट्रीय उद्यान अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

आणखी वाचा : सांगा पाहू या PHOTO मध्ये कुत्रा कुठे लपला आहे? शोधा म्हणजे नक्की सापडेल!

आपल्या पिल्लाला मॅनहोलमध्ये पडलेलं पाहून, त्याचा जीव कळवळताना पाहून हत्तीणीचा मोठा धक्का बसला. ही हत्तीण अतिशय तणावाखाली गेली होती. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी ही हत्तीण पुढे आली आणि यात ती मॅनहोलमध्ये घसरली. यात ती शरीराच्या आकारामुळे मॅनहोलमध्ये अर्धवट भागात अडकली. यात हत्तीण तणावाखाली गेल्यामुळे नॅशनल पार्कच्या कर्मचार्‍यांना या हत्तीणीला भूल द्यावी लागली. हत्तीणीच्या पिल्लाला क्रेनच्या मदतीने मॅनहोलमधून बाहेर काढण्यात अधिकाऱ्यांना यश आलं. परंतू या बचाब मोहिमे दरम्यान हत्तीण मात्र बेशुद्ध होती. त्यामुळे तिला जिवंत करण्यासाठी बचावकर्त्यांना सीपीआर करावी लागली. त्यानंतर ही हत्तीण तिच्या पायांवर उभी राहिली. हत्तीण आणि तिचं पिल्लू दोघेही सुखरूप पुन्हा आपल्या मार्गाला निघून जातात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : विनाशाचे संकेत? मच्छिमारांनी पकडला १६ फूट लांबीचा ‘शापित’ मासा, ११ वर्षांपूर्वीही भूकंप आला होता

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला

हा व्हिडीओ सीबीएस न्यूजने ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोक वारंवार पाहू लागले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केलीय. नेटिझन्सनी बचाव पथकाने केलेल्या जलद कारवाईचे कौतुक केलंय. ““व्वा! किती विलक्षण अनुभव. ते लोक खरे हिरो आहेत,” असे एका युजरने लिहिले.तर दुसऱ्या युजरने कमेंट करताना लिहिलं केली, “हे खरे नायक आहेत.”