सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंडचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही अतिशय गंभीर आणि विचार करायला लावणारे असतात. सध्या असाच एका आईचा आणि मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ही आई आपल्या मुलाची प्रतिक्रिया शूट करण्यासाठी त्याला स्वतःचा व्हिडीओ शूट करायला सांगते. ती आपल्या मुलाच्या हातात मोबाईल देते आणि त्यानंतर ती वेगवेगळ्या कृती करू लागते आणि ते बघून मुलाची प्रतिक्रिया व्हिडिओमध्ये कॅप्चर होते. या मुलाची प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आई नाचताना तर तिचा मुलगा शूटिंग करताना दिसत आहे. मात्र या फोनचा मुख्य कॅमेरा मुलाकडे असतो हे त्या मुलालाही माहीत नसते. हा मुलगा आईने केलेल्या विचित्र कृती पाहून हसत राहतो. पण व्हिडीओमध्ये या मुलाची प्रतिक्रिया शूट होत असते. या व्हिडिओच्या शेवटी या मुलाची प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे जी फार गोंडस आहे. मुलाची प्रतिक्रिया शूट करण्यासाठी आईने केलेल्या विचित्र स्टेप्स देखील नेटकाऱ्यांचे मनोरंजन करत आहेत.

( हे ही वाचा: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ पाकिस्तानी महिला; लता मंगेशकर यांच्या गाण्यावरील ‘ती’ अदा पाहून नेटकरीही फिदा)

येथे व्हिडिओ पहा

( हे ही वाचा: Video: सलमान खानच्या ‘या’ गाण्यावर थिरकली आफ्रिकन मुलं; भन्नाट डान्सने नेटकऱ्यांनाही लावले वेड…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत १.९ मिलियांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १.५ लाख लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओला अनेकांनी कंमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले, “खूप सुंदर! माणसाचे पहिले प्रेम त्याची आई असते.” दुसरा म्हणाला, “हा ट्रेंड मला एकाच वेळी रडवतो आणि हसवतो, तो खूप गोंडस आहे.”