Viral Video : सोशल मीडियावर बस आणि बसचालकाचे अनेक व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये बसच्या आत बोनेटवर असे काही लिहिलेय की कुणी त्या बोनेटला धक्का सुद्धा मारणार नाही. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की चालकाने बोनेट बॉक्सवर लिहिले तरी काय? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ बसच्या आतील भागातील आहे. या व्हिडीओमध्ये चालक बस चालवत आहे. बसमध्ये प्रवासी सुद्धा बसलेले दिसल आहे. अनेकदा बसमध्ये खूप गर्दी असते तेव्हा काही प्रवासी ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या बोनेटवर बसतात किंवा त्यावर उभे राहतात. त्यामुळे या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की ड्रायव्हरने बोनेटवर लिहिलेय, “लक्ष्मीला पाय लावू नये” या व्हिडीओवर लिहिलेय, “ज्या कामातून घर चालते, ते प्रत्येक काम मंदिराप्रमाणे पवित्र असते. ड्रायव्हरचं गाडीवर असलेलं प्रेम” ( MSRTC bus Video St driver wrote on bus bonnet or bus engine hood do not touch your leg on Lakshmi video goes viral on social media)

Kitchen Tips | which things should not store in fridge
Kitchen Tips : तुम्ही फ्रिजमध्ये अर्धवट मळलेली कणीक ठेवता? आताच थांबवा; जाणून घ्या, फ्रिजमध्ये कोणत्या वस्तू ठेवू नये?
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Heroic Railway Employee Saves Young Woman from Suicide: Viral Video
आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळाकडे धावली तरुणी, कर्मचाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले, धक्कादायक VIDEO VIRAL
Apple Sheera Recipe | how to make Apple Sheera
Apple Sheera Recipe : सफरचंदाचा शिरा! रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा Video
Young Man Abuses Girlfriend on Street
तुम्ही याला प्रेम म्हणता का? भररस्त्यात प्रेयसीबरोबर तरुणानं केलं असं काही की…; VIDEO पाहून तुम्हीच सांगा यात चूक कुणाची?
boyfriend tries to convince his upset girlfriend on the road
रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी तरुणानं भर रस्त्यात काय केलं पाहा; सगळेच पाहू लागले अन् शेवटी…, VIDEO झाला व्हायरल
An innocent girl student danced in class while everyone closed their eyes
बालपण देगा देवा! वर्गात सुरु होती प्रार्थना अन् डोळे मिटून चिमुकली एकटीच नाचत होती, गोंडस Video एकदा पाहाच
pune video | Dhol Tasha Pathak Clears Road for Ambulance
Pune Video : ढोल ताशाचा गजर अन् एकच गर्दी! आपत्तीची चाहूल लागताच पथकाने रुग्णवाहिकेसाठी केला रस्ता मोकळा, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा : ‘गुलिगत, एका बुक्कीत…’ सूरज चव्हाणचा ट्रेंडिंग गाण्यावरील डान्स तुफान व्हायरल; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “भावा, बिग बॉसमध्ये तुला फुल…”

पाहा व्हायरल व्हिडीओ

बोनेट हे बसच्या इंजिनच्या डब्यावर बसवलेले कवच असते. एका चालकासाठी बोनेट हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे चालकाने या बोनेटला लक्ष्मी संबोधले आहे.

हेही वाचा : जंगलातील ‘या’ तीन शावकांचा VIDEO पाहिलात का? भिंतीवर ठेवलं डोकं, कॅमेऱ्याकडे बघून दिली पोज अन्… नेटकरी म्हणाले, “छोटा राजा…”

socialkatta91 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काम हीच पूजा आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जी व्यक्ती ही गाडी चालवत असेल त्यांना माझ्याकडून…” तर एका युजरने लिहिलेय, “पुण्याची बस आहे हिंजवडी ते पुणे”आणखी एका युजरने लिहिलेय, “जसं आपल हृदय असत असच हे लक्ष्मीचं हृदय आहे…कोणीही यावर पाय ठेवू नये अथवा बसू नये…” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.