Anand Mahindra Viral Video : नवीन कार खरेदी करणे हे सामान्य माणसाचे एक स्वप्न असते. खूप मेहनतीने आपल्या कमाईवर कार खरेदी करणे हा अनेक कुटुंबांसाठी एक आनंदाचा क्षण असतो. अनेक कुटुंबे आपल्या घरात नवीन सदस्य आल्याप्रमाणे कारचे स्वागत करतात. इतकेच नव्हे, तर ती खरेदी करण्यासाठी कुटुंबातील सदस्यही त्या शोरूममध्ये पोहोचतात. यावेळी शोरूममध्ये आलेल्या ग्राहकांना चहा, कॉफीसह अनेक गोष्टींची व्यवस्था केली जाते; पण त्यांच्याबरोबर आलेल्या लहान मुलांसाठी कुठलीही व्यवस्था नसते. त्यामुळे एका लहान मुलाने याच मुद्द्यावर बोट ठेवत चक्क देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याकडे तक्रार केली आहे; ज्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुलाने काय तक्रार केली?

उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याकडे एका मुलाने व्हिडीओच्या माध्यमातून एक तक्रार केली आहे. त्याने व्हिडीओत म्हटलेय की, इथे सर्व काही गोष्टी फक्त मोठ्या लोकांसाठीच का आहेत? इथे चहा, कॉफी सर्व काही आहे; पण लहान मुलांसाठी काहीच का नाही? त्याचा हा व्हिडीओ आनंद महिंद्रांना टॅग करण्यात आला आहे; जो व्हायरल झाल्यानंतर उद्योगपती आनंद महिंद्रांनीही त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘ही’ आहेत जगातील पाच सर्वांत महागडी घड्याळे; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल चकित

आनंद्र महिंद्रा काय म्हणाले?

आनंद महिंद्रा यांनी मुलांच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देत म्हटले की, कोणती कार खरेदी करायची यात कुटुंबे आपल्या मुलांचीही मते घेत असतात. त्यामुळे कुटुंबात कार खरेदी करताना मुलांच्या मतांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव असतो. अद्विकचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आम्ही शोरूममध्ये मुलांना महत्त्व देण्याच्या दृष्टीने पुरेसे प्रयत्न करीत नाही. मला खात्री आहे की, आमची टीम अद्विकच्या सूचनेनुसार आता काम करील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@vikaasgarg या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता; जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर अनेक युजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “सर, ही आयडिया खरोखरच खूप छान आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “सर तुमचे उत्तर पाहून मजा आली.” त्याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.