Rain viral video: दिवाळीचा उत्साह असतानाच मुंबईसह नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये अचानक जोरदार पावसाने पर्यावरण बदलले. लोकांच्या फटाके फोडण्याच्या योजना धोक्यात आल्या आणि सोशल मीडियावर हा जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. “देव, चिनी दिव्यांच्या गुणवत्तेची चाचणी घेत आहे” अशा विनोदी कमेंट्सला बरेच लाइक्स मिळाले. पावसामुळे शहरातील हवा स्वच्छ झाली; परंतु दिवाळीच्या पारंपरिक उत्साहात थोडी मंदी आली.
मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकावरून एक व्हिडीओ शेअर केला गेला आहे, ज्यात दिसतेय की, पावसामुळे फटाके फोडण्याची गरज नाही. रेल्वेस्थानकाच्या परिसरात पावसामुळे रस्ते ओले झाल्याचे दिसत असून, काही लोक फटाके न फोडता पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत.
व्हिडीओमधील दृश्य मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकाच्या परिसरातील आहे, जिथे अचानक पाऊस सुरू झाला. लोक पावसामुळे थांबलेले दिसत आहेत, काही जण छत्रीम सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काही लोक फटाके फोडण्याच्या पारंपरिक उत्साहात ते काहीशी थट्टामस्करीची भूमिका घेत आहेत. पावसाने अनेकांच्या फटाके फोडण्याच्या उत्साहावर पाणी फिरवीत, एकूण वातावरणच बदलून टाकले आहे.
पाहा व्हिडिओ
याबाबत सोशल मीडियावर अनेक विनोदी आणि रंजक प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी लिहिले, “असे दिसते की देव या दिवाळीत चिनी दिव्यांच्या गुणवत्तेची आणि टिकाऊपणाची चाचणी घेत आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “ऑक्टोबरमध्ये पाऊस? मुंबई म्हणतो — मी दिवाळीसाठी थोडा जास्त प्रकाश पाडेल!”काहींनी इंद्रदेवाच्या आतषबाजी आणि वादळाच्या संयोजनाचे वर्णन करीत #DiwaliMood हा हॅशटॅग वापरला. तर काहींनी विनोदाने लिहिले, “हिवाळा येत आहे, लोक बोलत आहेत, पाऊस कुठून येत आहे?”
काही युजर्सना आनंद झाला की, पावसामुळे फटाक्यांनी निर्माण केलेली धूळ कमी होईल. तर, काहींनी लिहिले, “पावसाला कोणताही धर्म नसतो – तो ईदला येतो, नवरात्रीला येतो, दिवाळीला येतो.” काहींनी मीम्ससुद्धा शेअर केल्या, “कोणीतरी फटाके फोडत आहे की वादळ आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करीत आहे.”
मंगळवारी सायंकाळी ५ वाजता मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने पावसाची आणि वाऱ्यांची सूचना दिली. वारे ३०-४० किमी प्रति तास गतीने येऊ शकतात. येत्या काही दिवसांत तापमानात घट अपेक्षित असून, आठवड्याच्या शेवटी थोडे पावसाळी वातावरण परत येण्याची शक्यता आहे. मुंबईकरांसाठी हा दिवाळीचा अनुभव अनपेक्षित पावसामुळे थोडा वेगळा ठरला;पण सोशल मीडियावर विनोद आणि कमेंट्सच्या जोरावर उत्साह कायम राहिला.