Mumbai-Pune viral video: तु्म्हीही मुंबई-पुणे हायवेवरुन प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण मुंबई-पुणे जुन्या हायवेवरुन प्रवास करताना तुमच्यासोबतही हे घडू शकतं. भर दिवसा काही लोक येतील आणि तुमची फसवणूक करुन निघून जातील..आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नक्की प्रकरण काय? तर झालं असं की सध्या मोठ्या प्रमाणात टायर पंक्चर घोटाळा होत आहे. यामध्ये आता आणखी एका प्रकरणाची भर पडली असून, एका व्यक्तीने हा सर्व प्रकार कैद झाला आहे. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तु्म्हालाही धक्का बसेल.
मुंबई पुणे हायवेवरुन हजारो वाहने रोज प्रवास करत असतात. मुंबई पुणे जुन्या हायवेवरुन बाईकस्वारदेखील प्रवास करतात. दरम्यान, आता या हायवेवर अनेकांनी फसवणूक झाल्याची घटना आहेत. दरम्यान, आता या फसवणूकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई पुणे हायवेवर पळस्पे फाटा ते चौकदरम्यान काही अज्ञात व्यक्ती असतात. हे व्यक्ती टायर पंक्चर करुन प्रवाशांना लुबाडण्याचे काम करतात. हे चोर मोटारसायकलवरुन येऊन सांगतात की, तुमच्या टायरमधील हवा कमी झाली आहे.यानंतर त्यांना पंक्चरच्या दुकानात घेऊ जातात आणि त्यांच्याकडून पैसे लुबाडतात.
@alert_by_ride नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सर्व घडलेली घटना सांगितली आहे. मुंबई पुणे जुन्या हायवेला पळसपे फाटा ते चौक पर्यंत पंचरचे झोल खूप वाढले आहेत . आपण कमी स्पीडला चाललो असतो तेव्हा मागून बाईक वरून आपणाला टायरमध्ये हवा कमी असल्याचं सांगितल जाते,आपण त्या व्यक्तीला टाळल तर मागून अजून एक जण येवून तुम्हाला हात लावून हवा कमी असल्याचं सांगितल जातं, आपण घाबरून नजीकच्या टायर वाल्याकडे जावून हवा चेक करतो पण ते हवेचे प्रेशर कमी दाखवून आपल्या टायरमध्ये १०-१५ किंवा जास्त पंक्चर हातचालखीने काढून कमीतकमी १००० रुपयाच्या वर्ती फटका लावतात. हे प्रमाण खूप वाढलं आहे. प्रवास करतो मुंबई पुणे रोड ला माझ्यासोबत अस २ वेळा एकाच जाग्यावर झाल आहे
मुंबई पुणे हायवेला कुठे ही पंक्चर काढू नका.
पाहा व्हिडीओ
नेटकरीही यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी आपले अनुभवही शेअर केले आहेत. एकानं म्हंटलंय, “मी observe केल्या प्रमाणे एक प्लान आहे…. हे त्याच गाडी ला टारगेट करतात ज्या गाडी र मागे लेडीज असेल…” तर दुसऱ्या युजरने “सेम स्कॅम नवले ब्रिज कडून नवीन बोगद्याकडे जाताना पंचर वाले करतात टू व्हीलर वर येऊन गाडी पंचर आहे असं सांगतात.” असं म्हंटलंय. फक्त मुंबई-पुणे हायवेवरच नाहीतर “माझ्यासोबत पण same स्पॉट ला घडलेलं आहे….कर्जत वरून पनवेल ला जाता वेळेस..” असं सांगितलं आहे.