सोमवारी मुंबईत मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे वाहतूक आणि विमान प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाला आणि शहराचे अनेक भाग पाण्याखाली गेले. दादर, माहीम, परळ, वांद्रे आणि कालाचौकी सारख्या भागात मुसळधार पावसामुळे दैनंदिन जीवन ठप्प झाले.

व्हिडिओंमध्ये कुर्ला, सायन आणि दादर सारख्या सखल भागात पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून वाहने चालताना दिसत आहेत. मुसळधार पावसामुळे केईएम रुग्णालयातही गंभीर पूर आला, जिथे पाणी तळमजल्यात शिरले आहे. माटुंगा आणि हिंदमाता भागातूनही पाणी साचल्याचे वृत्त समोर आले. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-वाडा रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

सोमवारी मुंबई पुन्हा एकदा पावसाळ्याच्या संकटातून जात असताना, सोशल मीडियाच्या टाइमलाइन्स शहराच्या संघर्षावरील मीम शेअर केल्या आहेत. तरंगत्या ऑटोंवरील विनोदी कमेंटपासून ते पावासात भिजत ऑफिसला जाणाऱ्यांपर्यंत, मुंबईकरांनी त्यांची निराशा विनोदातून व्यक्त केली आहे. एका मागून एक पोस्ट व्हायरल होत आहे.

इंटरनेटवरील काही सर्वाधिक चर्चेत असलेल्या मीम्सवर एक नजर टाका:

मोठ्या प्रमाणात शेअर केलेल्या एका मीममध्ये बाहुबली २ मधील एका दृश्याचा वापर करण्यात आला होता, ज्यामध्ये शिवगामी महेंद्र बाहुबलीला नदीतून घेऊन जात असतानाचा प्रसिद्ध क्षण दाखवण्यात आला होता. एका वापरकर्त्यासाठी, हे दृश्य आज ऑफिसमध्ये जाणाऱ्या लोकांच्या संघर्षाचे ते उत्तम प्रकारे दर्शवते, ते अशाच प्रकारे हातात लॅपटॉप घेऊन पावसातून जात असल्याची कल्पना करतात.

एक्स वर, एका वापरकर्त्याने एक स्क्रीनशॉट पोस्ट केला ज्यामध्ये लिहिले होते, “आज आकाश खूप निळे आहे आणि प्रदूषण नाही! कालच्या सर्व पावसाबद्दल धन्यवाद.” पोस्टबरोबर कॅप्शनमध्ये असे लिहिले होते, “पावसाळच्या दिवशी मुंबईच्या उत्साहाबद्दल अनिवार्य पोस्ट. कृपया काळजी घ्या, मुंबईकरांनो.” या पोस्टबरोबर ऑस्कर विजेचा कोरियन चित्रपट पॅरसाईटमधील दृश्य शेअर केले आहे. चित्रपटातही पूर परिस्थितीनंतरचा हा क्षण आहे जिथे पुराचा सामना करणारा गरिब डी चालवत आहे तर आलिशान बंगल्यात बसून आनंद घेणाऱ्या श्रींमत बाई हा डायलॉग बोलते. जो दोन भिन्न आयुष्य जगणाऱ्या लोकांची मानसिकता दर्शवते.

दुसऱ्या वापरकर्त्याने क्लासिक मुघल-ए-आझममधील एक प्रतिमा शेअर करत बॉलीवूडच्या नॉस्टॅल्जियाला स्पर्श केला आहेथे दिलीप कुमारचा सलीम मधुबालाच्या अनारकलीला म्हणतो, “उठो अनारकली. मुंबईची लोकांचा उत्साह पाहण्याची वेळ आली आहे. #MumbaiRains.”

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील एक क्लिपही प्रसारित झाली, ज्यामध्ये दिशा वकानी दयाच्या भूमिकेत उत्साहाने नाचत आहे. पोस्टला कॅप्शन देण्यात आले होते: “कामावर जायचे आहे पण बहुतेक पाऊसप्रेमी मुंबईकरांचा हा मूड आहे. जर मुसळधार पाऊस प्राणघातक ठरला तरी मुंबई बीएमसीच्यपेक्षा प्रतिकूल परिस्थितीशी लढण्यासाठी मुंबईकर तयार असेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या कोणीतरी प्रवासाचा सारांश असा दिला: “#MumbaiRains मुंबई पाऊस. जेव्हा तुम्ही पावसाळ्यात ऑटोमधून प्रवास करत असता आणि बाहेर काय चालले आहे ते पहायचे असते.”

आणखी मीम्स येथे पाहा