सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात अनेकदा भांडणाचे व्हिडीओ असतात, जे पाहून अक्षरश: धक्काच बसतो. अनेकदा या वादाचं रुपांतर मारामारीत होतं. तर अनेकदा अशीही परिस्थिती येते जिथे समोरच्याची चूक नसतानाही त्याला ऐकून घ्याव लागतं. सध्या असाच प्रकार एका टेम्पो चालकाबरोबर घडलाय. नेमकं काय प्रकरण आहे, जाणून घ्या…

अलीकडेच X वर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात वाहतूक पोलीस आणि टेम्पो चालक यांच्यात शाब्दिक भांडण होतं. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पो चालकाच्या टेम्पोचा वाहतूक पोलीसने फोटो काढल्यावर चालकाने आक्षेप घेतला. यामुळे त्या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि भांडण टोकाला पोहोचलं.

वाहतूक पोलीस आणि टेम्पो चालकामधला वाद

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, वाहतूक पोलीस त्याच्यासमोर थांबलेल्या टेम्पोचा फोटो घेताना दिसत आहे. हा संपूर्ण प्रकार फोनवर रेकॉर्ड करणाऱ्या टेम्पो चालकाने फोटो काढल्यानंतर वाहतूक पोलिसांवर आक्षेप घेतला. त्यानंतर तो फोटो का काढला असा जाब विचारला.

वाहतूक पोलीस सुरुवातीला टेम्पो ड्रायव्हरला प्रत्युत्तर देण्यास टाळण्याचा प्रयत्न करतात, परंतु जेव्हा त्याला कळते की टेम्पो चालकाने व्हिडिओ चालू केल आहे, तेव्हा तो त्याला शांत करण्यासाठी पुढे येतो. वादाच्या सुरूवातीला टेम्पो चालक वाहतूक पोलिसांना विचारतो “फोटो का काढला”. यावर उडवाउडवीची उत्तर देत वाहतूक पोलीस म्हणतो “क्लिनर नाही क्लिनर” यावर टेम्पो चालक त्याला म्हणतो “या गाडीला क्लिनर अलाउड नाहीय” यानंतर टेम्पो चालक पुन्हा पुन्हा फोटो का काढला हा प्रश्न विचारत राहिल्याने ट्रॅफिर पोलिस तो फोटो डिलीट करतो आणि वाद मिटवतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या एक्स अकाउंटवरून @tv_mumbai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली असून, कांदिवली व्हायरल व्हिडीओ अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. ही घटना नेमकी कुठे घडली हे अस्पष्ट आहे. मात्र, मुंबई टीव्हीने व्हिडिओ पोस्टला दिलेल्या कॅप्शननुसार, हा व्हिडिओ कांदिवली परिसरात शूट करण्यात आल्याची माहिती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडिओवर मुंबई वाहतूक पोलिसांची प्रतिक्रिया

मुंबई वाहतूक पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओला प्रतिसाद देत संबंधित वाहतूक विभागाला या प्रकरणाची माहिती दिल्याची पुष्टी केली. X वर मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत हँडलने एक कमेंट लिहिली, “आम्ही संबंधित वाहतूक विभागाला सूचित केले आहे.” या प्रकरणी अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्याचे वृत्त नाही.