नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते अनेकदा त्यांच्या मजेदार पोस्टमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. नागालँडमध्ये सध्या हॉर्नबिल उत्सव सुरु आहे. या उस्तवाची खास झलक नागालँडचे मंत्री तेमजेन सोशल मीडियावर दररोज शेअर करत असतात.पण, आज त्यांच्या एका खास फोटोने सगळ्यांचं पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. कारण- नागालँडचे मंत्री तेमजेन यांची एका बॉलीवूड अभिनेत्रीच्या कुटुंबाबरोबर भेट झाली आहे.
नागालँडचे उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग यांची अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या आई-वडिलांबरोबर भेट झाली. सेंद्रिय भोपळा नागालँडमधील कृषी विपुलतेचे प्रतीक आहे. तसेच तेमजेन यांनी दीपिकासाठी तिच्या आई-वडिलांकडे हा सेंद्रिय भोपळा खास भेटवस्तू म्हणून पाठवून दिला आहे आणि बॉलिवूड चित्रपटातील दीपिकाच्या भूमिकेबरोबर हा किस्सा अगदीच खास पद्धतीने जोडला आहे. नागालँडचे मंत्री तेमजेन यांनी पोस्टमध्ये नक्की काय खास कॅप्शन लिहिलं एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.
हेही वाचा…आफ्रिकेतील मालावी आंबा पुण्याच्या बाजारात
पोस्ट नक्की बघा :
दीपिका पदुकोणसाठी पाठवली भेटवस्तू :
नागालँडचे मंत्री तेमजेन यांनी अभिनेत्री दीपिका पदुकोणचे आई-बाबा बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि उज्जला पदुकोण यांच्याबरोबर सेंद्रिय भोपळा देताना मजेशीर हावभाव देत फोटो सुद्धा काढला आणि “दीपिका पदुकोणसाठी एक ऑरगॅनिक भेट. दीपिकाच्या पालकांच्या हातात नुकतीच एक ऑरगॅनिक भेटवस्तू सुपूर्द केली. कारण-कुठेतरी मस्तानीला नागालँडच्या अप्रतिम भाज्यांचे विशेष कौतुकही वाटते…” अशी कॅप्शन लिहिली आहे.
२०१५ मध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा “बाजीराव मस्तानी” हा चित्रपट खूप गाजला. चित्रपटातील दीपिका पदुकोणची ‘मस्तानी’ची भूमिका आजही अनेक प्रेक्षकांच्या मानत रुजलेली आहे. तर नागालँडचे मंत्री तेमजेन यांनी सुद्धा भोपळा ही भेटवस्तू देताना दीपिका पदुकोणच्या मस्तानी भूमिकेची आठवण काढली आणि खास कॅप्शन लिहिलं. सोशल मीडियावर ही पोस्ट नागालँडचे मंत्री यांच्या अधिकृत @AlongImna एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे ; जी अनेकांचा लक्ष वेधून घेत आहे.