Navratri Tu Hi Durga: नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये रेल्वे स्टेशन, बस, ऑफिस, गरबा- दांडियाला एकाच रंगात नखशिखांत सजून अनेकजण दिसतात. यंदा याच उत्साही मंडळींसाठी लोकसत्ता.कॉम तर्फे एक अत्यंत खास उपक्रम राबवण्यात आला होता. ‘तू ही दुर्गा’ या उपक्रमात आपण सहभागी स्पर्धकांना त्यांचा नवरात्री मूड दाखवणारा फोटो लोकसत्ताच्या पेजवर शेअर करण्यास सांगितले होते. याशिवाय स्पर्धेच्या दुसऱ्या प्रकारात रील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हजारो स्पर्धकांमधून चार अत्यंत कल्पक विजेत्यांची नावे अलीकडेच जाहीर करण्यात आली.
लोकसत्ता ‘तू ही दुर्गा’ स्पर्धेच्या विजेत्यांना आकर्षक नथ व लोकसत्ता तर्फे विशेष बक्षीस देण्यात आले होते. विशेष म्हणजे या विजयी स्पर्धकांना हे सुंदर बक्षीस महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेराव व प्रसाद खांडेकर यांच्या हस्ते देण्यात आले होते.
तर, लोकसत्ता ‘तू ही दुर्गा’ स्पर्धेच्या विजेत्या आहेत.
१) मिताली मिलिंद सुर्वे
मिताली यांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोल्हापूरची अंबाबाई म्हणजेच देवी महालक्ष्मीची सुंदर रांगोळी रेखाटली होती. नऊ दिवस नऊ वेगळ्या रंगांनी ही रांगोळी सजवण्यात आली होती.
२) जिजा शिंदे
दुर्वा शिंदे यांनी चिमुकली जिजाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगांचे सुंदर कपडे घालून तिचे फोटोशूट केले होते. खण- नारळाची ओटी आणि फुलांची सजावट करून घरगुती पद्धतीने केलेले हे फोटोशूट खास ठरले.
३) मृणाल गंजाळे
पिंपळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षिका मृणाल गंजाळे यांनी शाळेतील सहकारी महिलांसह नवरात्रीचा सुंदर मूड टिपलेला फोटो शेअर केला होता. मृणाल यांना नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
४) ऐश्वर्या पालव
तू ही दुर्गा उपक्रमातील रील स्पर्धेच्या विजेत्या ऐश्वर्या पालव यांनी मुंबई लोकलमधील दसऱ्याच्या सेलिब्रेशनचा सुंदर व्हिडीओ शेअर केला होता. १ लाखाहून अधिक व्ह्यूज असलेला हा व्हिडीओ यंदाच्या स्पर्धेतील विजेता ठरला आहे.
वरील विजेत्यांप्रमाणे आपणही लोकसत्ताच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. या उपक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या पेजला सोशल मीडियावर सुद्धा फॉलो करायला विसरू नका.