‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याची जगभरात जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचं कारणं म्हणजे, चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा ९५ वा ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली, त्यामध्ये ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या गाण्याची आणि गाण्यातील डान्सची पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

शिवाय या गाण्याला ऑस्कर पुरस्कार घोषित होताच जगभरात त्याची मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळत आहे. कारण सोशल मीडियावर अनेकांनी या गाण्यावर डान्स करत त्याचे रील शेअर करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. या डान्सवर रील केल्याचे अनेक व्हिडीओ लोक इंटरनेटवर शेअर करत आहेत. अशातच आता उद्योगपती हर्ष गोयंका यांनी पाकिस्तानातही या गाण्याची क्रेझ किती आहे हे दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही पाहा- लग्न ठरलंय? सावधान! आधी कोर्ट मॅरेज नंतर घरच्यांच्या इच्छेने ७ फेरे; सासरी पोहोचायच्या आधीच पळाली नवरी, कारण…

हेही पाहा- भररस्त्यात कारमध्ये उभं राहून तरुणीने केला डान्स, ट्रॅफिक झालं जाम; Video पाहून नेटकरी म्हणाले “वाहतूक नियमांचे…”

ज्यामध्ये या गाण्यावर एक मुलगा आणि मुलगी जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. शिवाय व्हिडीओवरुन तो डान्स एका लग्न समारंभात केल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना हर्ष गोयंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिली आहे की, “पाकिस्तानात कोणत्या गाण्याची क्रेझ आहे, ओळखा!” या व्हिडीओवरुन पाकिस्तानातील तरुणाईला देखील नाटू नाटू गाण्याची किती भुरळ पडली आहे हे दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाटू नाटू हे गाणं आणि त्यातील डान्स अप्रतिम आहे हे सांगण्याची गरज नाहीच, पण या व्हिडीओतील मुलांनीही उत्तम डान्स केला आहे. गाण्यातील सर्व स्टेप्स ते बरोबर फॉलो करत त्यांनी हा डान्स केल्यामुळे नेटकरी व्हिडीओतील मुलाचं आणि मुलीचंही कौतुक करताना दिसत आहेत. तर गोयंका यांनी शेअर केलेला व्हिडीओ आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहेत. तर त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, कलेला सीमा नसतात. कलेची स्वतःची भाषा असते. कला सर्वात संसर्गजन्य आहे. आम्ही ऑस्कर जिंकला आणि भारतीय कलेला जागतिक व्यासपीठावर आणल्याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे.