आपल्या घरातील एखादा सदस्य हरवला किंवा घर सोडून गेला तर त्यासाठी घरातील व्यक्ती कासावीस होऊन त्याचा शोध घेतात. नाही मिळाला तर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देऊन वर्तमानपत्रात जाहिरात देतात. त्यातही समाधान झाले नाही तर त्या व्यक्तीला शोधून देणाऱ्या व्यक्तीसाठी बक्षिस जाहीर करतात. ही बाब सामान्य आणि अपेक्षित अशीच आहे. मात्र हे सगळं एखादा पाळीव प्राण्यासाठी होत असेल तर? तर अशी घटना दुर्मिळच म्हणावी लागेल. मात्र अशीच एक घटना दिल्लीजवळच्या नोएडामध्ये घडली आहे. एवढंच नाहीतर या मांजरीला शोधून देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात येणार आहे.

मांजर शोधणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस

नोएडामध्ये एक पाळीव मांजर हरवल्याने तिच्या मालकाने तिला शोधून देणाऱ्याला एका लाख रूपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मांजरीला शोधण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. ज्यावर बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

नोएडातील सेक्टर ६२ मधून १४ दिवसांपूर्वी एक मांजर बेपत्ता जाली होती. आपल्या मांजरीला शोधण्यासाठी मालकाने १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मांजर हरवल्यानंतर मालकाने पोस्टर लावत मांजरीची संपूर्ण माहिती आणि त्याखाली १ लाख रुपयांचा इनाम असे लिहले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अजय कुमार यांची मांजर हरवली आहे. ते नोएडातील सेक्टर ६२ मध्ये हार्मनी अपोर्टमेंटमध्ये राहतात. त्यांची मांजर १४ दिवसांपूर्वी हरवली होती. तिचे नाव चिकू आहे. अजयच्या मित्राने त्याला ही पर्शियन मांजर भेट म्हणून दिली होती.

चीकूला परत मिळवण्याचा हा शेवटचा प्रयत्न

सुरुवातीला २ तास अजय आणि दीपाला वाटले की चीकू पलंगाखाली किंवा घराच्या कोपऱ्यात लपला आहे. मात्र शोधल्यावर मांजर कुठेच सापडले नाही. चिकू शेवटी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला मात्र नंतर तो पार्किंगमधून कुठे गेला ते कळलं नाही. यावेळी अजय म्हणतो की, मला सर्वात जास्त भीती याची वाटते की त्याला कोणीही चांगल्या किंमतीत विकू शकते. पर्शियन मांजरीची किंमत माहित असलेल्याच कोणीतरी चिकूला नेले आहे. म्हणूनच मी बक्षीस म्हणून एवढी मोठी रक्कम ठरवली आहे. चीकूला परत मिळवण्याचा हा शेवटचा प्रयत्न आहे असं तो सांगतो.पण मांजर हरवल्याची तक्रार होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे,” तो पुढे म्हणाला.

मालकानं लावले पोस्टर

हेही वाचा >> खेडेगावातला हा तरुण शिकवतो अमेरिकन अ‍ॅक्सेंटमध्ये इंग्रजी; VIDEO पाहून कराल कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो शेअर करत चिकूला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी पोलिसांतही तक्रार केली. परंतु काहीही माहिती न मिळाल्याने त्यांनी मांजर शोधून देणाऱ्या व्यक्तीस १ लाख रुपयांचा इनाम जाहीर केला.