Noida Road Rage On Camera Shocking Video Viral : उत्तर प्रदेशातील नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात एका थारचालकाने कायदा आणि सुव्यवस्थेला उघड आव्हान दिल्याचा प्रकार घडला आहे; ज्यामुळे लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका थारचालकाने प्रथम एका तरुणाला जबर मारहाण केली, त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला रस्त्यावरच सोडून दिलं. धक्कादायक बाब म्हणजे, जखमी तरुण रक्ताळलेल्या अवस्थेत रस्त्याने जात असताना थारचालकाने पाठीमागून येत त्याला थारने जोरदार धडक दिली. या धडकेत तरुण रस्त्याकडेला असलेल्या नाल्यात पडला. या घटनेचा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सध्या पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, ही भयानक घटना २ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता सेक्टर २४ पोलिस ठाण्याच्या परिसरातील सेक्टर ५३ मध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत जखमी झालेला तरुण सौरभ यादव हा सेक्टर ३९ मधील रहिवासी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कमेंट करण्यावरून त्याचा एका व्यक्तीबरोबर वाद झाला, या वादात दोन्ही बाजूंनी एकमेकांना मारहाण झाली, ज्यात सौरभ यादव आणि त्याचा भाऊ गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत रस्त्यावरून जात असताना मागून ती व्यक्ती भरधाव थार घेऊन येत येत सौरभला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, तो उडून थेट एका खोल नाल्यात पडला.
NOIDA
थार… थार…एक बार फिर थार चालक की रंगबाजी!
लहूलुहान युवक को पीटा फिर थार से मारी टक्कर!
सेक्टर 53 का मामला!
PS 24 pic.twitter.com/XRU5w5G87nThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— हिमांशु शुक्ल (@himanshu_kanpur) June 3, 2025
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, काळा शर्ट घालून एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावरून चालतोय. त्याच्या मानेतून आणि डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत आहे. अंगावरचे कपडे फाटलेत. याचदरम्यान त्याच्या पाठीमागून एक काळ्या रंगाची थार कार येते आणि त्याला जोरदार धडक देते, ज्यामुळे तरुण उडून थेट नाल्यात पडतो. याच थारचालकाने धडक देण्यापूर्वी त्याला गंभीररीत्या मारहाण केली होती.