Nothing Phone 3 Launched In July : आपण सगळेच परवडणाऱ्या किमतीत फोन खरेदी करण्याचा विचार करत असतो. जर तुम्हीही अशाच फोनच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. लवकरच नथिंग फोन मार्केटमध्ये येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत दमदार अशी वैशिष्ट्ये मिळणार आहेत. कारण- जुलैमध्ये ‘नथिंग फोन ३’ लाँच होणार आहे, जो ब्रँडचा फ्लॅगशिप स्मार्टफोन कॅटेगरीत प्रवेश करणार आहे. ब्रँडचा हा पहिला हाय-एंड स्मार्टफोन, जो उच्च दर्जाचा परफॉर्मन्स देईल. तसेच स्मार्टफोन अक्वालकॉमच्या नवीन फ्लॅगशिप प्रोसेसर, स्नॅपड्रॅगन ८ एलिटने सुसज्ज आहे, असे सांगण्यात आले आहे. कंपनीचे संस्थापक कार्ल पेई यांनी, सॅमसंग गॅलेक्सी एस२५, वनप्लस १३ व शाओमी १५ सीरिजसारख्या हाय-एंड मॉडेल्सशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने ‘नथिंग फोन ३’ लाँच करण्यात येणार आहे, असे सांगितले आहे. दरम्यान, ‘नथिंग फोन ३’ भारतात केवळ त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे विकला जाईल, असेसुद्धा आवर्जून सांगितले आहे.
नथिंगने अलीकडेच एक्स (ट्विटर)वर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये नथिंग फोन (१)च्या मागील बाजूस असलेले एलईडी दिवे हळूहळू बंद होत असल्याचे दिसून आले आहे. त्याबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘आम्ही ग्लिफ इंटरफेसला काढून टाकत आहोत.’ त्यामुळे कंपनी फोन ३ च्या लाँचची तयारी करत असताना तिच्या एका सिग्नेचर फीचरला निवृत्त करण्याच्या बहुतेक विचारात आहे, असे कंपनीच्या सूत्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नथिंग फोन ३ ची भारतातील किंमत (Nothing Phone 3 India Price )
नथिंग फोन ३ युकेमध्ये सुमारे £८०० (सुमारे $१,०६४ किंवा ९०,५१० रुपये) च्या अंदाजे किमतीत लाँच होण्याची अपेक्षा आहे. त्या तुलनेत मागील मॉडेल, १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेजसह, नथिंग फोन (२) £६२९ (सुमारे $८३६ किंवा ७१,१८५ रुपये) लाँच करण्यात आला होता, ज्याची भारतीय किंमत ४९,९९९ रुपये आहे. फोन ३ मध्ये बिल्ट-इन एआय फंक्शनॅलिटीज असणार आहे.
चिपसेट आणि बॅटरी (Nothing Phone 3 Battery)
नथिंग फोन ३ मध्ये स्नॅपड्रॅगन ८ जनरल ३ चिपसेट, १२ जीबी पर्यंत रॅम व ५१२ जीबी अंतर्गत स्टोरेज असेल. 50W जलद चार्जिंगला सपोर्ट असलेल्या या डिव्हाइसमध्ये ५००० एमएएच बॅटरी असेल, असे सांगण्यात आले आहे.
डिझाइन ((Nothing Phone 3 Design )
नथिंग फोन ३ मध्ये लक्षणीय डिझाइन अपडेट्स येतील, ज्यामध्ये वनप्लस १२ ची आठवण करून देणारा वर्तुळाकार कॅमेरा असणार आहे. मागील पॅनलमध्ये विशिष्ट ग्लिफ इंटरफेस समाविष्ट असेल, जो इनकमिंग कॉल्स, मेसेजेस व इतर अलर्टसाठी व्हिज्युअल सूचना देतो. याव्यतिरिक्त, स्मार्टफोनमध्ये ६.७७-इंचाचा AMOLED LTPO डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे, जो १२०Hz रिफ्रेश रेट आणि ३,००० निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो

नथिंग फोन ३ कॅमेरा (Nothing Phone 3 Camera)
फोटोग्राफीप्रेमींसाठी त्यामध्ये ट्रिपल ५० एमपी रीअर कॅमेरा आणि ॲडव्हान्स रीअर सिस्टीमसह ३२ एमपी फ्रंट कॅमेरा असणार आहे. त्यामुळे स्पष्ट सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी हा फोन सोईस्कर ठरणार आहे.