दिवसेंदिवस रेल्वे प्लॅटफॉर्मवर वाढणारी गर्दी ज्येष्ठ नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे. घरी, कार्यालयात किंवा नातेवाईकांकडे लवकरात लवकर पोहोचण्यासाठी अनेकांना घाईच झालेली असते. पण ‘अती घाई संकटात नेई’, असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. अनेक प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असल्यावर ट्रेन पकडण्यासाठी धोकादायक प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक धक्कादायक घटना व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आली आहे.

रेल्वे सुरक्षा दलाच्या एका जवानाने जीवाची बाजी लावून एका वृद्ध महिलेला ट्रेनच्या अपघातापासून वाचवलं आहे. एका वृद्ध महिलेनं धावती एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न केला असता तिचा तोल गेला. त्यानंतर ती महिला एक्स्प्रेसच्या दिशेनं फरफटत गेली. त्याचदरम्यान ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलिसाने क्षणाचाही विलंब न लावता एक्स्प्रेच्या दिशेनं धाव घेऊन महिलेचे प्राण वाचवले. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
| Unable to board AC coach, angry passenger breaks train door’s glass Viral video
“रेल्वेच्या एसी डब्यात चढता येईना, चिडलेल्या प्रवाशाने रागात फोडली दरवाज्याची काच, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
Indian Railways Reacts to Viral Post
रेल्वेच्या आरक्षित कोचमध्ये फुकट्यांची मोठी गर्दी; व्हायरल पोस्टवर रेल्वेचे ‘असे’ उत्तर ऐकून प्रवाशांनी व्यक्त केला संताप
A young motorman who tried to commit suicide at Bandra station on Western Railway was saved by a motorman Mumbai news
मुंबई: मोटरमनच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा वाचला जीव

आणखी वाचा – Viral Video: अभिमानास्पद! अमेरिकन नवरीने लग्नात परिधान केला भारतीय लेहेंगा; हा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होताच, नेटकरी म्हणाले…’

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर-मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या एक्स्प्रेसला पकडण्यासाठी एका वृद्ध महिलेनं जीव धोक्यात टाकला. अकोला स्थानकावर पोहोचण्यासाठी अती घाई झालेल्या या महिलेनं चक्क धावती एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिला फरफटत जात असल्याचं ड्युटीवर असलेल्या एका रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने पाहिलं. त्याचदरम्यान त्या पोलीसाने कर्तव्यात जराही कसूर न करता जीवाची बाजी लावत महिलेला प्लॅटफॉर्मवरून बाहेर खेचलं.

इथे पाहा व्हिडीओ

ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. महिलेला सुखरूप बाहेर काढल्यानंतर पोलीस आणि महिलेच्या मदतीला शेजारी असलेले प्रवासी तत्काळ धाऊन आल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ एका युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. दरम्यान, अशीच एक धक्कादायक घटना केरळच्या तिरूर रेल्वे स्थानकावर नुकतीच घडली होती. त्यावेळी अशाच प्रकारे रेल्वे पोलिसांनी धाडस करून एका चिमुकलीचं प्राण वाचवलं होतं.