Kaanta Laga Girl Shefali Jariwala Video : शेफाली जरीवालाचं शुक्रवारी, २७ जूनच्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. . शेफालीच्या निधनाने तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे तर मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. २००२ मध्ये शेफाली जरीवाला ‘कांटा लगा’ या गाण्यात झळकली होती. हे गाणं इतकं लोकप्रिय झालं होतं की शेफाली रातोरात घराघरात पोहचली. त्यामुळे तिला सर्वत्र काटा लगा गर्ल म्हणून ओळखले जाते.

शेफालीच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच धक्का बसला. सोशल मीडियावर स्टार्सपासून चाहत्यांपर्यंत अनेक जण तिला श्रद्धांजली वाहत आहे. तिचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. अशातच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती पारस छाबरा च्या शोमध्ये बोलताना दिसत आहे. ती एक वाक्य असं काही बोलते की ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की पारस शेफालीला विचारतो, “तुला प्रत्येक जण काटा लगा गर्ल.. काटा लगा गर्ल म्हणतात, तु थकली नाही का काटा लगामुळे”
त्यावर शेफाली त्याला सांगते, “प्रश्नच उठत नाही. या जगात फक्त एक काटा लगा गर्ल आहे आणि ती मी आहे. मला खूप आवडते. मला वाटते की लोकांनी मला मरेपर्यंत काटा लगा गर्ल म्हणून ओळखावे.”
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांसाठी हा व्हिडीओ भावुक करणारा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ व्हायरल

शेफाली च्या अंत्यसंस्काराचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत शेफालीला अखेरचा निरोप देताना तिचे आई-वडील, बहीण व पती पराग धाय मोकलून रडताना दिसले. अभिनेत्री शहनाज गिल, आरती सिंग, पारस छाबरा, हिमांशी खुरानासह अनेक कलाकारांनी तिच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन तिला श्रद्धांजली वाहिली.