scorecardresearch

ट्रेनमधून मोबाईल चोरणाऱ्या चोराला प्रवाशांनी अशी घडवली अद्दल; गयावया करत म्हणाला, “दादा मी मरेन…”

एक चोर ट्रेनच्या खिडकीमधून प्रवाशाचा मोबाइल चोरी करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र यानंतर त्याच्यासोबत जे झालं त्याचा आपण विचारही केला नसेल.

ट्रेनमधून मोबाईल चोरणाऱ्या चोराला प्रवाशांनी अशी घडवली अद्दल; गयावया करत म्हणाला, “दादा मी मरेन…”
या चोराबरोबर जे झालं त्याचा आपण विचारही केला नसेल. (twitter)

रेल्वेप्रवास करत असताना अनेकदा आपण मोबाईल किंवा इतर महत्त्वाच्या वस्तू चोरीला जाण्याच्या घटनांबद्दल ऐकले असेल. अशीच एक घटना समोर आली आहे. एक चोर जमालपूर-साहिबगंज पॅसेंजर ट्रेनच्या खिडकीमधून एका प्रवाशाचा मोबाइल चोरी करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याला मोबाईल चोरी करण्याआधीच त्याला पकडण्यात आले. यानंतर त्याच्यासोबत जे झालं त्याचा आपण विचारही केला नसेल. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ही घटना लैलाक-घोघा रेल्वे स्टेशनची असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे चोरांची एक टोळी प्रवाशांचे फोन चोरी करून पळत होते. दरम्यान, याचवेळी ट्रेन सुरु झाली. यावेळी इतर चोर पळ काढण्यास यशस्वी ठरले, मात्र एक चोर प्रवाशांच्या हाती लागला. प्रवाशांनी या चोराला खिडकीतून पकडले. ट्रेनच्या खिडकीला लटकलेला हा चोर प्रवाशांकडे आपल्या प्राणाची भीक मागत होता.

Video : विमानतळावर हृदयविकाराचा झटका आलेल्या वृद्धाला CISF जवानाने दिले जीवनदान; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

प्रवाशांनी या चोराचे दोन्ही हात खिडकीतून ट्रेनच्या आत ओढले आणि चोर ट्रेनच्या बाहेर लटकत राहिला. ट्रेन भरधाव वेगाने जात होती, यावेळी चोर प्रवाशांना त्याचा हात न सोडण्यासाठी विनंती करत होता. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण या चोराला गयावया करताना पाहू शकतो. तो प्रवाशांना म्हणतो, “माझा हात सोडू नका” यानंतर प्रवाशांनी चोराला आपत्कालीन खिडकीमधून आत खेचले आणि त्याची धुलाई केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या