सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर मगरीचे अनेक व्हिडिओ येत असले तरी हा व्हिडिओ वेगळा आणि धोकादायकही आहे. मगर किती क्रूर प्राणी आहे, याचा अंदाज अनेकदा लोकांना नसतो. बर्याच व्हिडिओंमध्ये तुम्ही मगरीला इतर प्राण्यांची शिकार करतानाही पाहिलं असेल, पण तुम्ही कधी मगरींचा अख्खा तलाव पाहिलाय का, नाही ना मग हा व्हिडीओ नक्की पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मगरींनी भरलेलं तलाव आहे. एक व्यक्ती बोटमध्ये बसून एका हातात कॅमेरा पकडून या तलावात जात आहे. बोट एकदम वेगाने पळवतो या तलावात प्रवेश करतो. त्याच्या या वेगाने तलावातील मगरदेखील वेगाने बाजूला पळतात. हे दृश्य अंगावर काटा आणणारे आहे. व्हिडीओ पाहताना हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये एका जरी मगरीने हल्ला केला तरी यामध्ये बोटीत असणाऱ्यांचा जीव जाण्याची शक्यता आहे. पाहा व्हिडीओ हेही वाचा - Video: स्कूल बसच्या दरवाजात अडकला चिमुकला, ड्रायव्हरने तसंच फरफटत नेलं, मुलाची अवस्था पाहून… हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एकंदरीतच हा व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधत असून चांगलाच व्हायरल झाला आहे.