Truck Shayari Viral Video: आपण अनेकदा ट्रकच्या मागे लिहिलेली शायरी पाहिली असेल. अशा शायऱ्या किंवा चारोळ्या अनेकदा लोकांचं मनोरंजन करण्यासाठी असतात. पण, सध्या अशाच एका शायरीमुळे एक ट्रकचालक अडचणीत आला आहे. या शायरीमुळे पोलीस अधिकारी ट्रकचालकावर नाराज झाल्याचे दिसतेय. याच घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. जाणून घेऊ या नेमकं काय घडलं ते…

वृत्तानुसार, ट्रकचालक महामार्गावरून प्रवास करताना एक पोलीस अधिकारी त्याच्या मिनी ट्रकच्या खिडकीवरील शायरी वाचून संतापला आणि अधिकाऱ्याने वाहन थांबवून चालकाला फटकारले.

हेही वाचा… त्याने पॅंटची चेन उघडली अन्…, स्कूटरने पेट घेताच तरुणांनी काय केलं पाहा, VIDEO पाहून कपाळावर माराल हात

ट्रकवरील ती शायरी वाचून पोलीस संतप्त

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, पोलीस अधिकाऱ्याने ट्रकवरील शायरी वाचून ट्रक चालकाला थांबवलं आणि त्याला विचारलं, “हस मत पगली प्यार हो जाएगा, किससे प्यार हो जाएगा? तुम इतने खुबसूरत हो? (कोणावर प्रेम होईल, तू एवढा देखणा आहेस?)” ट्रकच्या दुसऱ्या बाजूलाही तेच लिहिलं असल्याने पोलीस अधिकारी त्याला पुढे म्हणाला की, “किधरसेभी देखेगा कोई तो हस मत पगली प्यार हो जाएगा, अरे कितने खूबसूरत हो यार, क्या बात है ड्रायव्हर साहब इधर आओ (कुठूनही पाहिलं तरी तेच, अरे तू किती सुंदर आहेस यार, ड्रायव्हर, जरा इथे ये)” असं म्हणत पोलीस अधिकाऱ्याने ड्रायव्हरला त्याच्याजवळ बोलवलं आणि फटकारलं.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ @akhil.kumar.funny.vidio या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “यांचं आज लक्ष गेलंय” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल १३.९ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा… असा मित्र नशिबाने भेटतो! ‘तो’ अचानक छतावरून खाली कोसळला अन्…, वाचवण्यासाठी मित्राने केली धडपड, पाहा थक्क करणारा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “खूप छान काम केलं सर, सलाम.” तर दुसऱ्यानं “याला काय प्रॉब्लेम आहे”, अशी विचारणात्मक कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “आज भावालाही प्रश्न पडत असेल की, कोणत्या दुर्दैवी काळात हे लिहिण्याचा विचार माझ्या डोक्यात आला.” तर “नशीब, कोणीतरी यावर बोललं” अशीही कमेंट एकानं केली