भारतीय महिलेने चूल-मूल यांच्या पलिकडे जात आकाशाला गवसणी घातली आहे असे आपण अनेकदा म्हणतो. महिला घराबाहेर पडली, कमावती झाली, आपले कर्तृत्व सिद्ध करु लागली हे सगळे तर खरे आहेच पण विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, अवकाश अशा पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रातही महिलांनी आपले आगळेवेगळे स्थआन निर्माण केले आहे. कधी गावातील एखादी महिला बचत गट चालवत आणखी चार महिलांना रोजगार उपलब्ध करुन देते तर कधी तीच पेट्रोल पंपावर हिमतीने उभी राहते. दरम्यान राज्यातील सामन्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या एसटीच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतिहासात आता पहिल्यांदा एका महिला ड्रायव्हरने बस चालविली आहे.

या ऐतिहासिक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्चना अत्राम असे या महिलेचे नाव असून या चालक महिलेने पहिल्यांदाच बसचे स्टेअरिंग हातात घेत प्रवाशांना सुरक्षितपणे आपल्या थांब्यावर पोहोचविण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. अर्चना अत्राम या काही पहिल्याच एसटी बस चालक नाहीत, पण या मार्गावर एसटी बस चालवणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत. अहमदनगर ते पुणे या पहिल्या बसचे चालक आणि वाहक दोघेही अहमदनगरचे होते. लक्ष्मण केवटे हे एसटी महामंडळातून ३० एप्रिल १९८४ रोजी सेवानिवृत्त झाले होते. अहमदनगर ते पुणे हे सव्वाशे किलोमीटरचं अंतर कापत एसटीने पहिला प्रवास केला. आता एसटीने पुन्हा एक क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेने बस चालवली आहे. एसटी सुरु झाल्याच्या तब्बल ७५ वर्षांनी महिलेच्या हातात एसटीचे स्टेयरींग आले आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड-जेजुरी मार्गावर महिलेने चालवली बस आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – कृतज्ञ हत्ती! जीव वाचवल्यानंतर हत्तीनं मानले जेसीबीवाल्याचे आभार, पाहा व्हायरल Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही महिला चालकाचा एसटी चालवतानाचा व्हिडीओ शेअर करत त्यांचे अभिनंदन केलं आहे. अनेक प्रवासी अर्चना यांना चालकाच्या सीटवर पाहून अव्वाक झाले. यानंतर अनेकांना त्यांचा व्हिडीओ काढण्याचा मोह आवारता आला नाही. ज्यानंतर अर्चना यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.