Pune Sarasbaug Ganpati : पुणे शहर हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. दर दिवशी हजारो पर्यटक पुणे दर्शनाला येतात. येथील ऐतिहासिक ठिकाणे आणि संस्कृती पाहून भारावून जातात. पुण्यातील शनिवार वाडा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, लाल महल, नाना वाडा, इत्यादी पर्यटन स्थळे खूप लोकप्रिय आहेत. पुण्यातील सारसबागचा गणपती बघायला दुरवरुन लोक येतात. हे सुद्धा एक लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळ आहे.
सारसबागच्या गणपतीला तळ्यातला गणपती सुद्धा म्हटलं जातं. हिवाळ्यामध्ये या गणपतीची खास चर्चा रंगते कारण हिवाळा सुरू झाला आणि जोरदार थंडी सुरू झाली की या गणपती बाप्पाला स्वेटर घातले जाते. दरवर्षी या गणपतीचे स्वेटरमधील फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सुद्धा गणपतीने स्वेटर घातलेले दिसत आहे.

या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की बाप्पाला स्वेटर घालण्यात आला आहे. केशरी पांढऱ्या रंगाचे सुंदर लोकरचे स्वेटरमध्ये गणपती खूप सुंदर दिसतोय. या फोटोवर लिहिलेय, “पुण्यात थंडी वाढल्याने सारसबागेतील बाप्पाला दर वर्षी प्रमाणे स्वेटर घालण्यात आला.”

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. अशा थंडीच्या कडाक्यात बाप्पांना स्वेटर घालण्यात आला आहे. या स्वेटरमध्ये बाप्पाची मुर्ती सुरेख दिसत आहे. सोशल मीडियावर याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

punerifeeds या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गेल्या काही दिवसांपासून पुण्यात हुडहुडी भरली असल्याने सारसबागेतील आपल्या लाडक्या बाप्पाला लोकराचा स्वेटर आणि कानटोपी घातली आहे. ही परंपरा गेल्या ४० वर्षांपासून चालू आहे. संध्याकाळी आरती झाली ती बाप्पाला स्वेटर, कान टोपी मफलर घातलं जातं. अनेक भाविक असे सुंदर वस्त्र बाप्पाला अर्पण करण्यासाठी आपल्या घरी तयार करुन आणून देतात.”
या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी “गणपती बाप्पा मोरया” असे कमेंट्समध्ये लिहिलेय.