Pune Viral Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले या शहराचा इतिहास सांगतात. याशिवाय पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथील खाद्यसंस्कृती, भाषा अत्यंत लोकप्रिय आहे. पुणेरी पाट्या तर नेहमी चर्चेचा विषय असतात. सोशल मीडियावर सुद्धा पुण्यातील अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. पुणेकरांचे मजेशीर व्हिडीओ सुद्धा चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
हा व्हिडीओ पुण्यातील एका चौकातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की सिग्नल सुटले आहे आणि गाड्या त्यांच्या मार्गाने जात आहे. पण या व्हिडीओमध्ये तु्म्हाला काहीतरी विचित्र दिसेल जे लक्ष वेधून घेणारे आहे. व्हिडीओत एक व्यक्ती चक्क रस्त्याच्या मधोमध झोपलेला दिसत आहे. तो बिनधास्त डोक्यावर हात ठेवून ऐटीत झोपलाय. त्याला रस्त्यावरील गाड्या, लोक ये-जा करताना दिसताहेत तरीसुद्धा तो उठत नाही. तुम्हाला स्वारगेट जाणाऱ्या गाड्या या व्हिडीओमध्ये दिसतील. गाड्या चालवणारे लोक, बसमधील प्रवासी, ये- जा करणारे लोक त्याच्याकडे बघत आहे. पण त्याला काहीही फरक पडलेला दिसत नाही उलट तो त्यांच्याकडे ऐटीत बघताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल. त्या व्यक्तीविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. असं म्हणतात, पुण्यात काहीही होऊ शकतं आणि पुणेकर काहीही करू शकतात आणि हे या व्हिडीओत दिसून येत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
bappa_morya_0official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणेकर”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “झोपलाय मस्त” तर एका युजरने लिहिलेय, “पुणेकराचा नाद करायचा नाय” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे काय चाललंय पुण्यात” काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
यापूर्वी सुद्धा पुण्यातील असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.