Pune Video Viral: पुण्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पुणेरी पाटी, पुणेकरांचे नियम अशा अनेक गोष्टी चर्चेत असतात. त्यात नियम म्हणजे नियम असं मानणारे पुणेकर कोणतीही चुकीची गोष्ट पचवून घेत नाहीत.

वाहतुकीचे नियम सगळ्यांनीच पाळले पाहिजेत असं वारंवार सांगूनही अनेक चालक फक्त आपलीच मनमानी करतात. नियम मोडून मोकळे होतात आणि स्वत:ला हुशार समजू लागतात. अशा लोकांवर कारवाई होणं तितकंच महत्त्वाचं असतं. रस्त्यावर दादागिरी करून अनेकदा आपलं ते खरं करणाऱ्यांची संख्या वाढत चाललीय. अशांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांना एका तरुणीने चांगलीच अद्दल घडवली आहे.

तरुणीने घडवली चांगलीच अद्दल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत ट्रॅफिक असल्याने अेक गाड्या रस्त्यावर तशाच उभ्या असल्याचं दिसतंय. तसंच ट्रॅफिकमध्ये अडकलेले अनेक दुचाकीस्वार आपली बाईक, स्कुटी घेऊन बाजूला असलेल्या फुटपाथवरून पुढे जाताना दिसतायत. पण, एका तरुणीने नियम मोडणाऱ्या या दुचाकीस्वारांना चांगलीच अद्दल घडवल्याचं दिसतंय.

एक तरुणी फुटपाथवर उभी राहून तिथून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवत आहे आणि त्यांना रस्त्यावरूनच गाडी चालवा असा इशारा देत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @ pune_trending_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “तुम्ही पुणेकरांचे नियम मोडले नाही पाहिजे” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच याला तब्बल एक मिलियन व्ह्युज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं की, “नियम मोडले नाहीच पाहिजे, कारण ते आपल्याचसाठीच असतात.” तर दुसऱ्याने “आधी रस्ते नीट करून सरकारने नियम पाळावे.. मग आम्ही पाळू” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “ही नक्की ट्रॅफिक पोलिस असणार”, तर अनेकांनी हा व्हिडीओ पुण्यातला नसून दिल्ली किंवा कर्नाटकातील आहे असंदेखील कमेंट करून सांगितलं आहे.