वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२३ च्या ३१व्या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने मुंबई इंडियन्सचा १३ धावांनी पराभव केला. या सामान्यानंतर अर्शदीप सिंगची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. कारण या सामन्यात अर्शदीपने ४ बळी घेतले, ज्यामुळे पंजाबचा सहज विजय झाला. अर्शदीपने या सामन्यात ४ विकेट घेतल्याचं कौतुक झालंच पण त्याने आपल्या उत्कृष्ट आणि वेगवान गोलंदाजीने या सामन्यात चक्क स्टंप तोडला. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या गोलंदाजीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शिवाय त्याच्या या कामगिरीवर सध्या वेगवेगळी मिम्स व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशातच आता पंजाब किंग्ज संघाच्या @PunjabKingsIPL या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुन एक मजेदार ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये त्यांनीअर्शदीपने तोडलेल्या स्टंपचा फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये मुंबई पोलिसांना टॅग करत लिहिलं आहे की, आम्हाला गुन्हा नोंदवायचा आहे. महत्वाची बाब म्हणजे या ट्विटची दखल खुद्द मुंबई पोलिसांनी घेतली. मुंबई पोलिसांनी पंजाब किंग्जच्या ट्विटला मजेदार रिप्लाई दिला आहे. ज्यामध्ये आपण कोणावर गुन्हा दाखल करतो याची माहिती दिली आहे.

हेही वाचा- IPL सामन्यातल्या LED स्टंप्सची किंमत काय असते? अर्शदीपने दोनदा स्टंप्स तोडल्याने अख्ख्या जगाला पडला प्रश्न

मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, “कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असते, स्टंप मोडणाऱ्यांवर नाही.” मुंबई पोलिसांच्या या भन्नाट उत्तरामुळे सध्या हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय अनेक नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मुंबई पोलीस जबरदस्त असल्याचं लिहिलं आहे. तर काहींनी “मुंबई पोलीस लईच भारी” असं म्हटलं आहे. आणखी एका नेटकऱ्यांनी “मुंबई पोलिसांचं खतरनाक उत्तर” असं कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे.

नक्की काय घडलं?

हेही पाहा- रेल्वे ड्रायव्हर मोबाईल पाहण्यात व्यस्त; एकाच ट्रॅकवर दोन गाड्या आल्या अन्…, भयंकर अपघाताचा Video व्हायरल

मुंबई इंडियन्सला शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. यावेळी अर्शदीपने शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी केली. टीम डेव्हिडने पहिल्याच चेंडूवर एकच धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने एकही धाव दिली नाही, तो डॉट पडला. मग त्याने तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्माला क्लीन बोल्ड केले आणि यावेळी त्याच्या गोलंदाचीचा वेग इतका होता की त्याच्या चेंडूने थेट मधला स्टंप तोडला. षटकातील चौथ्या चेंडूवर नेहल वढेराला क्लीन बोल्ड केले आणि पुन्हा स्टंप दोन भाग होऊन ते दूरवर फेकले गेले. अर्शदीप सिंगच्या चेंडूची गती इतकी होती की त्यामुळे स्टंपचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेकांनी अर्शदीपची उत्कृष्ट गोलंदाजी बीसीसीआयला महागात पडल्याचंही म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab kings complain to mumbai police via tweet after arshdeep breaks stumps the response of police went viral jap
First published on: 23-04-2023 at 12:09 IST