Rashmika Mandana Viral Deepfake Video: लाइटहाऊस जर्नालिझमला भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना आढळून आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ बनावट असून डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आल्याचे आढळून आले.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ ची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट चर्चेत आहे. रणबीर कपूर चित्रपटात जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे आणि त्याची झलक पोस्टर आणि क्लिपमध्ये आधीच देण्यात आली आहे. साऊथची सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदान्ना या चित्रपटात रणबीर कपूरसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता नुकताच रश्मिकाचा हा एडिट केलेला व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.

काय होत आहे व्हायरल?

इंस्टाग्राम यूजर Ankita Rajput ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन बघा.

या व्हिडिओला 29K पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

इतर वापरकर्ते देखील हा व्हिडिओ शेअर करताना दिसतात.

तपास:

व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स घेऊन आणि त्यावर रिव्हर्स इमेज सर्च वापरून, या सारखेच व्हिडिओ दर्शविणारे विविध रेसलतंस आम्हाला प्राप्त झाले. काही व्हिडिओंमध्ये अभिनेत्री रश्मिका मंदान्ना तर काहींमध्ये दुसरी एक महिला दिसत होती. Reddit वरील एका पोस्टमध्ये व्हिडिओमधील महिला झारा पटेल असल्याचे नमूद केले आहे.

Zara patel
byu/Doughannoo inBeautifulIndianWomen

आम्हाला आढळले की मूळ व्हिडिओ झारा पटेलने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केला आहे.

आम्हाला X वर एक पोस्ट देखील सापडली, ज्यात हा व्हिडिओ डिबंक केलेला दिसत होता.

अमिताभ बच्चन यांनीही ही माहिती रिट्विट केली आहे.

डीपफेक म्हणजे काय?

डीपफेक हे कृत्रिम माध्यम आहेत जे सखोल तंत्र वापरून तयार केलेले आहे. ते ‘डीप लर्निंग’ आणि ‘फेक’ यांचे मिश्रण म्हणजे डीपफेक. या माध्यमातून एका प्रतिमेची वैशिष्ट्ये दुसर्‍या प्रतिमेच्या वैशिष्ट्यांसह बदलता येतात. डीपफेक तंत्रज्ञान, ज्याला डिसीव्हिंग एआय म्हणून ओळखले जाते, त्याचे नाव डीप लर्निंगवरून घेतले आहे. एआयचा हा एक प्रकार असून Deepfake AI मध्ये, मोठ्या डेटा सेटसह डीप लर्निंग अल्गोरिदम व्हिडीओ, इमेज आणि इतर डिजिटल कॉन्टेन्ट वापरून चेहरे बदलून बनावट फोटो व्हिडीओ बनवले जातात.

हे ही वाचा<< Video: रश्मिका मंदानाचा आक्षेपार्ह बनावट व्हिडीओ व्हायरल, अमिताभ बच्चन यांनी कायदेशीर कारवाईची केली मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा व्हायरल व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे हा एक डीपफेक व्हिडिओ आहे. व्हायरल व्हिडिओ बनावट आहे. मूळ व्हिडिओमध्ये दिसणारी महिला ही झारा पटेल आहे.