रेस्टॉरंटमधील स्वादिष्ट जेवण अनेकांना आवडते. यामुळे दररोज घरचं जेवण खाऊन कंटाळा आला तर आपण फॅमिलीसोबत रेस्टॉरंटला जाण्याचा प्लॅन करतो. पण तेथील चवदार, स्वादिष्ट जेवणावर ताव मारल्यानंतर पोट गच्च होतच शिवाय काहीवेळा झोपही खूप येते. अशावेळी वाटते की, आहे तिथेच थोडावेळ बसून एक झोप काढावी. पण काही केल्या ते शक्य होत नाही. पण जगात असे एक रेस्टॉरंट आहे जिथे एका खास डिश खाल्ल्यानंतर ग्राहकांना चक्क काहीवेळ झोपण्याची सुविधा दिली जाते. ही कल्पना थोडी विचित्र वाटत असेल पण ग्राहकांना खूप आवडली आहे.
अबर न्यूजच्या वृत्तानुसार, जॉर्डनमधील एक रेस्टॉरंट आपल्या ग्राहकांना देशातील प्रसिद्ध मनसाफ डिश खाल्ल्यानंतर एसीमध्ये झोपण्याची संधी देत आहे.
रेस्टॉरंटमध्ये पोटभर खा आणि आरामात झोपा
जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये असलेल्या मोआब या रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर एसी रुममध्ये आरामदायी बेडवर झोपण्याची ऑफर देत आहे, म्हणजेच रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर, तुम्हाला खूप जड वाटत असेल किंवा काही झोपण्याची इच्छा असेल तर हे रेस्टॉरंट त्यांच्यासाठी बेस्ट आहे. यात मनसाफ हा पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना झोप येते असा समज आहे. ही पारंपारिक लेव्हेंटाईन डिश आहे, जी मेंढीपासून बनवली जाते आणि दह्याची चटणी आणि शिजवलेल्या भातासोबत सर्व्ह केली जाते.
गंमत म्हणून सुरु केली ही अनोखी ऑफर
रेस्टॉरंट मालकचा मुलगा मुसाब मुबेदिन याने अरब न्यूजला सांगितले की, रेस्टॉरंटमध्ये बेड ठेवण्याची कल्पना एक विनोदी आणि सजावटीच्या उद्देशाने केली होती, जेणेकरून मनसाफ ही हाय फॅटयुक्त डिश खाल्ल्यानंतर ग्राहकांना झोप येण्याचा अनुभव येईल.
त्यांनी पुढे म्हटले की, ग्राहकांनी रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांना एकदिवस असचं झोपण्याची व्यवस्था करण्यास सांगितले, कारण झोपल्यानंतर त्यांना झोप येत होती. यावर मोबीदीन म्हणाले, यासाठी आम्ही रेस्टॉरंटमध्ये बेड सेट करण्यासाठी एक वेगळे सेक्शन बनवले. यामुळे ग्राहक आता मनसाफ खाल्ल्यानंतर थोडावेळ झोपून आराम करतात. या अनोख्या रेस्टॉरंटबद्दल @nowthisnews नावाच्या ट्विटर अकाउंटरवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो आता तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत ग्राहक मोहम्मद अल – ओकदाह यांनी म्हटले की, जॉर्डनमध्ये मिळणाऱ्या मनसाफ डिशने पोट खूप भरल्यासारखे वाटते. यामुळे ती खाल्ल्यानंतर थोडी झोप घेण्याची इच्छा होते. कारण मनसाफ डिशमुळे पोट जाड होते त्यामुळे झोपण्याची इच्छा होते. ही डिश खाल्ल्यानंतर तुम्हाला झोप लागली नाही तर समजा त्यात काहीतरी कमी आहे. सध्या रेस्टॉरंटची ही अनोखी ऑफर ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.