Mainpuri Viral Video : महाराष्ट्रात अनेक राज्यांमध्ये सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी तापमान घसरल्याचा अनुभव मिळतोय. सकाळी रस्त्यावर दाट धुके जाणवत आहे, त्यामुळे लोक थंडीपासून वाचण्यासाठी अंगावर उबदार कपडे, जॅकेट्स घालून फिरताना दिसत आहेत. असल्या कडाक्याच्या थंडीत बाईक चालवणे हे सर्वात कठीण काम असते, कारण बाईक चालवताना थंडी अंगाला फार बोचते. हात, पाय थंडीने सुन्न पडतात. अशा परिस्थितीत एका पोलिस हवालदाराने एक अनोखा जुगाड शोधून काढला आहे, जो पाहून तु्म्हालाही धक्का बसेल. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

प्रत्येक गुन्हेगाराच्या मनात पोलिसांबद्दल एक भीती असते. या भीतीपोटी अनेकदा कैदी पोलिस सांगतील ते ऐकतात. याच संधीचा फायदा घेत एका पोलिसाने स्वत:चे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी चक्क एका कैद्याला बाईक चालवायला सांगितली. यावेळी संधीचा फायदा घेत कैदी पळून जाऊन नये म्हणून त्याच्या हातात हातकड्या बांधलेल्या आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पोलिस हवालदार बाईकच्या मागे बसला आहे आणि हातकडी घातलेला कैदी थंडीत बाईक चालवताना दिसत आहे. व्हिडीओ नीट पाहिल्यास पोलिस हवालदाराने ही युक्ती कैद्याला शिक्षा देण्यासाठी नाही तर थंडीपासून वाचण्यासाठी केल्याचे दिसतेय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.

कैद्याने चालवली बाईक अन् पोलीस हवालदार बसला मागे

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हातात हातकडी बांधलेला एक कैदी बाईक चालवत आहे, यावेळी त्याच्या मागे एक पोलिस हवालदार बसला आहे. खाकी वर्दीतल्या हवालदाराकडे बघून तो आरोपीला त्याच्या हजेरीसाठी कुठेतरी घेऊन जात असल्याचा भास होतो. हे संपूर्ण प्रकरण मैनपुरी जिल्ह्यातील आहे. थंडीपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न पोलिस हवालदाराने केलेला असून त्याचा हा जुगाड आता त्यालाच महागात पडला आहे. कारण अशाप्रकारे एका कैद्याला घेऊन जाणे आणि विनाहेल्मेट बाईक चालवायला देणं कायद्यानुसार चुकीचे आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणी संबंधित पोलिस हवालदारावर कारवाईदेखील होण्याची शक्यता आहे.

हा व्हिडीओ @iamraviprasant नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर लोक त्यावर विविध प्रकारच्या कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘या कैद्याला चालान जारी केले पाहिजे, कारण तो हेल्मेटशिवाय बाईक चालवत आहे.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘उत्तर प्रदेश पोलिसांनी काय डोकं चालवलं आहे, आता कैदी पळूनही जाणार नाही.’ दुसऱ्याने लिहिले, ‘भाऊ, या पोलिसाने वेगळ्या लेव्हलचा खेळ खेळला आहे.’

हेही वाचा – बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल घेत मैनपुरीचे एसपी विनोद कुमार म्हणाले की, सीओ भोगाव यांना याबाबत तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल.