Shocking Accident Video : लहानपणी जत्रेत फिरताना तुम्ही गगनचुंबी आकाशपाळणे, वेगवेगळे ॲडव्हेंचर गेम्स पाहिले असतील, त्यामध्ये बसायची तुम्हालाही अनेकदा इच्छा झाली असेल किंवा तुमच्यापैकी अनेकांनी लहानपणी ही मज्जा लुटली असेल. पण, अशा पाळण्यात बसणे अनेकदा धोक्याचेही ठरू शकते. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

हे दृश्य पाहून तुमचाही थरकाप उडेल

हा धक्कादायक व्हिडीओ आसाममधील असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण एका पाळण्यात बसला होता, यावेळी तो बसलेल्या सीटचा लॉक अचानक निकामी झाला. अशाने तो पाळण्याबरोबर हवेत गोल गोल फिरत राहिला, त्यामुळे तो जोरात जमिनीवर कोसळला. हे दृश्य पाहून तुमचाही थरकाप उडेल.

व्हायरल व्हिडीओ ४ एप्रिल २०२५ रोजीचा आसाममधील लुमडिंगमधील शीतला पूजा मेळ्याचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक तरुण फिरत्या पाळण्यात आरामात बसला आहे, पण पाळणा जोरजोरात फिरत असताना अचानक तरुणाच्या सीटचा सेफ्टी बेल्ट निकामी झाला, त्यामुळे तरुण सीटवरून घसरून थेट पाळण्याला लटकू लागला. धक्कादायक बाब म्हणजे तो पाळण्यासह काहीवेळ गोल गोल फिरत राहिला. पण, पाळण्यावरून हात निसटल्याने तो जोरात खाली कोसळला, या घटनेनंतर सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उपचारांसाठी तरुणाला लुमडिंगमधील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले, तरुण या घटनेत गंभीर जखमी झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by The Whatup (@thewhatup)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा धक्कादायक व्हिडीओ पाहून लोकांनाही धक्का बसला आहे, त्यामुळे व्हिडीओवर ते वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, म्हणून विचार न करता जत्रेत आकाशपाळण्यात बसू नये. दुसऱ्याने लिहिले की, या माणसाचे नशीब म्हणून देवाची कृपा झाली, अन्यथा याचे जगणे आता कठीण झाले असते.