Viral video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच आपल्या गरिबी वाईट नसते. खरं तर हीच गरिबी आपल्याला लढायला शिकवते, असं म्हटलं जातं. आयुष्य हे फक्त आनंदी राहणं, हसणं किंवा मजा-मस्ती करण्यापुरतं मर्यादित नसतं. आयुष्यात कधी कधी थोडे दु:ख, संघर्ष आणि भरपूर कष्ट सहन करावे लागतात. कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली असते; तर कोणाची नसते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला खूप काही शिकवते. जी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला सामोरी जाते, तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडते. परिस्थिती व्यक्तीला जगायला शिकवते. शिकण्याच्या वयात जेव्हा खांद्यावर पुस्तकांच्या आधी जबाबदारीचं ओझं येतं ना तेव्हा नको ते कामही करावं लागतं. अशाच काही तरुणांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल.

हा व्हिडीओ पाहून “देवा पोटासाठी असा जिवघेणा संघर्ष कुणालाच देऊ नकोस रे” असं तुम्हीही म्हणाल. आपण आपल्या आजूबाजूला अशीही काही मुलं पाहतो; जी व्यसन, नशा, ड्रग्स यांच्या आहारी गेली आहेत. आई-वडिलांचा पैसा वाया घालवत ती मुलं चुकीची कामं करीत आहेत. मात्र, दुसरीकडे काही अशी मुलंही असतात की, ज्यांच्या खांद्यावर परिस्थितीमुळे कमी वयातच जबाबदारीचं ओझं येतं. या सगळ्यात ज्या मुलांना शिक्षण घ्यायचं असतं, त्यांनाही कधी कधी परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही, तर कधी कधी काही पैशांसाठी नको ते काम त्यांना करावं लागतं. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जबाबदारी आणि चार पैशासाठी हा तरुण स्वत:च्या जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. पोटासाठी सुरू असलेला त्यांचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

कधी कधी वाईट वेळेतही देव आपली परिक्षा बघत असतो. या तरुणासोबतही असचं झालं. भेळ विकणारा हा तरुण विशाल समुद्रात एका बोटीवरुन दुसऱ्या बोटीत जाताना त्याचा पाय घसरतो आणि त्याच्या हातातलं सगळं खाली पडतं. सुदैवानं तो समुद्रात पडत नाही. या तरुणाचा जीवघेणा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” मित्राच्या लग्नात तरुणानं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर abol_prembhasha नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “घरची जबाबदारी माणसाला खूप काही करायला भाग पाडते.” यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.