Car Accident Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक भयानक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, समतल, सुलभ अन् गुळगुळीत अशा रस्त्यावरून एक कार भरधाव जात आहे. कोणत्याही वाहनचालकाला अशा रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनाचा वेग वाढवण्याच मोह होतोच आणि त्यात त्या रस्त्यावर रात्री गाड्यांची फारशी वर्दळ नसेल, तर मग तो चालक बेलगाम गाडी चालवतो. त्या अंदाजानुसार त्या कारची गतीही सुमारे ९० ते १०० किलोमीटर प्रतितास राहिली असेल. सुरुवातीला रस्ता व्यवस्थित आणि गुळगुळीत दिसत होता; पण काही मीटर पुढे गेल्यावर असं दृश्य उघड होतं, की ते पाहताच प्रेक्षक घाबरून जातात.

अचानक पहिल्या खड्ड्यात अडकून कार अनियंत्रित होते

व्हिडीओत दिसत आहे की, कार काही अंतर पुढे गेल्यानंतर अंधाऱ्या आणि खडबडीत रस्त्यावरून जावे लागते. अचानक कारचे एक चाक पहिल्या खड्ड्यात अडकते. रस्त्यावर अंदाजे १० ते १२ मोठे खड्डे आहेत. वाहनचालकाला कदाचित रस्त्याच्या या खराब भागाचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटते आणि ती अचानक अनियंत्रित होऊन उडते, ज्यामुळे कारमध्ये बसलेल्या लोकांना गंभीर दुखापत झाली असण्याची शक्यता आहे.

व्हिडीओ पाहताच स्पष्ट दिसते की, गाडी वेगात असल्याने घडलेला हा अपघात नक्कीच साधा नव्हता आणि त्यामुळे कारमधील प्रवासी नक्कीच भीतीदायक अनुभवातून गेलेले असतील.

व्हिडीओ कुठला?

अद्याप, या अपघाताच्या अधिकृत ठिकाणाचा शोध लागलेला नाही. त्याबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत. काही लोक म्हणतात की, हा व्हिडीओ उत्तर भारतातील आहे; तर काहींना वाटते की,दक्षिण भारतातील एखाद्या मुख्य महामार्गाचा तो भाग असावा. या ठिकाणासंबंधीची योग्य ती माहिती अद्याप मिळालेली नाही.

लोकांकडून राग व्यक्त

व्हिडीओ शेअर होताच, सोशल मीडियावर लोकांचा राग उफाळून आला. अनेकांनी रस्त्याच्या खराब स्थितीवर प्रश्न उपस्थित केले. काही लोक म्हणाले, “जेव्हा रस्ते स्वतः मृत्यूचे जाळे बनतात, तेव्हा जबाबदारी कोणाची?”

काहींनी प्रशासनाकडे मागणी केली की, सडक बांधणी एजन्सीवर कठोर कारवाई केली जावी. कारण- अशा खड्ड्यांमुळे प्रत्येक वर्षी शेकडो लोक आपले जीव गमावतात.

काहींनी लिहिले, “हा व्हिडीओ रात्री ड्राइव्ह करणाऱ्यांना एक चेतावणी आहे. काही सेकंदांची लापरवाही जीवनाला धोकादायक ठरू शकते.”

शिकवण

हा व्हिडीओ फक्त धक्का देणारा नाही, तर सर्वांना सतर्क राहण्याची आणि वेग नियंत्रित ठेवण्याची आठवण करून देतो. रस्ता जरी सुरेख दिसत असला, तरी अचानक खड्डे आणि अंधारातील सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अनाकलनीय अडचणी जीवघेण्या ठरू शकतात.

निष्कर्ष

हा धक्कादायक व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर प्रत्येक वाहचालक आणि प्रवाशांना सावध राहायला भाग पाडतात. रस्त्याच्या खराब स्थितीवर नियंत्रण ठेवणे आणि प्रशासनाने सातत्याने अशा रस्त्यांची तपासणी करणे हे किती महत्त्वाचे आहे, हे या अपघातातून स्पष्ट होते.

येथे पाहा व्हिडीओ

एक क्षणाचे दुर्लक्ष हे जीवघेण्या अपघाताला आमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे प्रवासात वाहनचालकांसह सर्वांनी सातत्याने जागरूक राहणे आणि सुरक्षेच्या नियमांचे पान करणे किती आवश्यक आहे हेच ही घटना स्पष्ट करते.