रेल्वे अपघातांचं प्रमाण काही वर्षांपासून वाढतंच चाललंय. कधी आपल्याच चुकीनं कोणी रेल्वेखाली येतं, तर काहींना दुसऱ्यांच्या चुकीमुळे स्वत:चा जीव गमवावा लागतो. रेल्वे रूळ कधी ओलांडू नये, असं वारंवार सांगूनही काही जण आपल्याला वाटेल तेच करतात आणि मग अशाच माणसांमुळे गंभीर अपघात होतात. सध्या असाच एक अपघात एका माणसाबरोबर झालाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊ…

एका धक्कादायक घटनेत एक जण रेल्वे रुळाजवळ झोपला असताना त्याच्या अंगावरून ट्रेन गेली. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असे वृत्त आहे की, तो तरुण दारूच्या नशेत होता आणि त्याला ट्रेन दिसली नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी पेरू देशाची राजधानी लिमा येथे घडलेल्या धक्कादायक घटनेची पुष्टी केली.

धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फुटेजमध्ये तो माणूस रेल्वे रुळांजवळील जमिनीवर निपचित पडलेला दिसतो. तेवढ्यात एक मालगाडी रेल्वे ट्रॅकवरून येत असते. ती त्या माणसाच्या अंगावरून जाते. तथापि, ट्रेन थोडी पुढे गेल्यावर लगेच थांबते. ट्रेन थांबताच तो माणूस लगेच उठतो आणि यामुळे त्याला गंभीर दुखापत होत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @Anewz_tv या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

स्थानिक अधिकारी जनरल जेवियर अवलोस यांनी स्पष्ट केले की, तो माणूस नशेत होता. तो कदाचित दारू पिऊन रेल्वे रुळांवर झोपला असावा. त्यामुळे त्याला त्याच्या दिशेने येणारी ट्रेन जाणवली नाही किंवा ऐकू आली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धोका असूनही किरकोळ दुखापती

जीवघेणी परिस्थिती असूनही, तो माणूस खूप नशीबवान निघाला. त्याच्या डाव्या हाताला फक्त किरकोळ दुखापत झाली. आपत्कालीन मदत करणारे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्याला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात नेले. ही घटना दुर्दैवी ठरू शकली असती; पण आश्चर्य म्हणजे ???तो माणूस फक्त किरकोळ दुखापतींसह वाचला. (की- त्याच्यावरील जीवघेणे संकट फक्त किरकोळ दुखापतींवर निभावले.)??? अधिकाऱ्यांनी त्याची ओळख जाहीर केलेली नाही; परंतु भविष्यात अशा प्रकारची धोकादायक परिस्थिती टाळण्यासाठी लोकांना रेल्वे रुळांभोवती अधिक काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.