Shocking Video: नवरा बायकोचं नातं अनोखं असतं. या नात्यात जितकं प्रेम असतं तितकीच काळजी, तितकंच सुखदेखील असतं. पण, जर तुमचा जोडीदार तुमचा आदर करत नसेल आणि तुम्हाला वाईट वागणूक देत असेल, तर त्यापेक्षा चुकीचं आणि वाईट काहीच नाही. हल्ली लहान सहान गोष्टींवरून होणारे वाद मारहाणीपर्यंत पोहोचतात.

अनेकदा श्रीमंत सासर किंवा श्रीमंत मुलगा पाहून पालक आपल्या मुलींचं लग्न लावून देतात. पण काही माणसं फक्त पैशाने श्रीमंत असतात मनाने नाही. अनेकदा सासरी मुलींचा खूप छळ होतो. मुलींची हालअपेष्टा दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणबरोबर अन्याय झाला आहे, तिला खूप मारहाण झाली आहे. नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुणी रक्ताने माखली आहे. तिच्या चेहऱ्यावर, डोक्यात मारहाणीच्या खुणा आणि जखमा आहेत. अखंड त्रास सहन करून ती या व्हिडीओमध्ये रडताना दिसतेय.

तरुणीच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी जमलेली दिसतेय. काही महिला तिला सावरण्याचा, सांभाळण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. तरुणीची ही अवस्था नेमकी कोणी केली, नेमकं काय घडलं हे अद्याप समोर आलं नसलं तरी व्हिडीओच्या कॅप्शननुसार तिला तिच्या नवऱ्याने मारहाण केल्याचं लक्षात येतंय. सासरी तिला त्रास सहन करावा लागला असल्याने तिची ही अवस्था झाल्याचं या व्हिडीओतून कळून येतंय. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @vinya__editor या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “पालकांना फक्त एवढंच सांगणं आहे की मुलगा पैशाने श्रीमंत आहे हे बघण्यापेक्षा मनाने श्रीमंत आहे का हे बघा” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २.३ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “१००% बरोबर आहे… मनाची श्रीमंती हे सर्वात महत्वाचं आहे नात्यामध्ये..” तर दुसऱ्यानं “लोक सुनेवर –बायकोवर अत्याचार करताना असा विचार का करत नाहीत की आपल्याला पण मुलगी, बहिण आहे” अशी कमेंट केली. तर एका महिलेने आपल्याबरोबर घडलेली घटना कमेंट करत सांगितली, “सेम अशीच माझी बहिण चार वेळा रक्ताने भिजून आली होती तरी माझ्या बापाने परत पाठवली तिथेच रहा म्हणून…शेवटी मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन तिला वेगळं ठेवलं.”