Shocking video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही व्हिडीओ हसवणारे असतात तर काही व्हिडीओ रडवणारे असतात. अशातच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. यामध्ये एका महिलेने ऑटो रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी ऑटोरिक्षाचालकाला या तरुणीनं अतिशय क्रूरपणे चप्पलनंही मारहाण केलीय.
ही घटना शनिवारी घडली जेव्हा पंखुरी तिच्या पतीसोबत दुचाकीवरून प्रवास करत होती. रस्त्याने जात असताना पंखुरीच्या स्कुटीला रिक्षा लागली आणि तिच्या पायावरून चाक गेलं असा दावा करत तिने रिक्षा चालक लोकेशला जाब विचारायला सुरुवात केली. वादाच्या वेळी लोकेशने घटना रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली तेव्हा तिने लोकेशवर हल्ला केला.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही तरुणी रिक्षाचालकाला धमकावत आहे. “बनेगा व्हिडिओ? चल बना व्हिडिओ (तू व्हिडिओ बनवशील का? जा व्हिडिओ बनव),” या महिलेने पुढे वारंवार तिच्या चप्पलने लोकेशला मारहाण केली व त्यापुढे ती कॉलवर कुणालातरी कॉल करून ड्रायव्हरचा गैरवर्तन करत असल्याचं सांगताना ऐकू येत आहे. लोकेशने सांगितल्याप्रमाणे, की जेव्हा ती महिला स्थानिक भाषेऐवजी हिंदीमध्ये वाद घालत होती तेव्हा त्याने रेकॉर्डिंग सुरू केले मात्र मूळ व्हिडिओमध्ये कुठलाच भाषेचा वाद ऐकू येत नाही. दरम्यान अटक झाल्यानंतर मात्र पंखुरी आणि तिच्या पतीला चांगलीच अद्दल घडल्याचं दिसतंय कारण या मारहाणीच्या व्हिडिओनंतर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये हे जोडपं ऑटो चालकाची माफी मागताना आणि त्याच्या पाया पडताना दिसले. मी गर्भवती आहे आणि मला दुखापत झाल्यास बाळाला त्रास होईल अशी भीती वाटल्याने माझी अशी प्रतिक्रिया समोर आली असं पंखुरीने या व्हिडिओत म्हटलंय. तर बिहारची रहिवासी पंखुरीने आपल्याला कन्नड लोकांबद्दल कोणताही द्वेष नाही, असं सुद्धा ठळक करून सांगितलंय.
पाहा व्हिडीओ
व्हिडीओ व्हायरल होताच युजर्सने यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “गरिबाला त्रास दिला की असंच होतं” दुसऱ्याने “जर ही महिला बरोबर असती तर तिने इतके नाटक रचले नसते आणि ती थेट पोलिस स्टेशनला गेली असती. कारण- आजकाल महिलांच्या खोट्या तक्रारीवरही पोलिस पुरुषांवर कारवाई करतात” अशी कमेंट केली. तर आणखी एकानं, “महाराष्ट्रात असे दिवस कधी येतील, परप्रांतियांना चांगलाच धडा शिकवला.”