बंगळुरूमध्ये ‘पीक बेंगलुरु मोमेंट’ म्हणून ओळखला जाणारा एक अनोखा सोशल मीडिया ट्रेंड आहे, जिथे रहिवासी त्यांच्या दैनंदिन जीवनातील असामान्य आणि विचित्र घटना शेअर करतात. कधी कोणी स्कुटी चालवताना लॅपटॉप मांडीवर ठेवून मिटिंग करताना दिसते तर कोणी ट्रॅफिक सिग्नलला मोबाईलवर अभ्यास करताना दिसते. दरम्यान आता नवीन फोटो चर्चेत आला आहे ज्यामध्ये चक्क शूज खरेदी करताना एक महिला ऑफिस मिटिंगमध्ये सहभागी झाल्याचे दिसते आहे.
कार्तिक भास्कर नावाच्या एका एक्स वापरकर्त्याची पोस्ट व्हायरल झाली आहे ज्यामध्ये एक महिला शुज खरेदी करातना तिच्या लॅपटॉप घेऊन ऑफिस मिटिंगमध्ये सहभागी झाली आहे. फोटोमध्ये दिसते महिला शूजच्या दुकानात असून तिच्या एका हातात लॅपटॉप आहे ज्यावर ती ऑफिस मिटिंगसाठी उपस्थित आहे. या फोटोलो लोक ‘पीक बेंगलुरु मोमेंट’ म्हणत आहे.
फोटो पोस्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर त्वरित व्हायरल झाला. फोटोवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहे. काही लोकांनी फोटो मजेशीर वाटला आणि त्यांनी या परिस्थितीबद्दल हलके-फुलके विनोद केले. बेंगळुरूमधील अनेकांनी स्विकारलेल्या मल्टीटास्किंग जीवनशैलीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून त्याकडे पाहिले.
हेही वाचा – “निबंध लिहिलेला कागद गाडीत ठेवून अपघात…”, पुणेरी पाटी घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणाचा Video Viral
पण हा फोटो सर्वांचे मनोरंजन करू शकला नाही. या फोटो पाहून अनेकांनी बदलत चाललेल्या वर्क क्लचरबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतलुन न राखता येण्याचे नकारात्मक परिणाम अधोरेखित केले, ज्यामुळे तणाव आणि थकवा येऊ शकतो.
एकाने लिहिले, “दिवसेंदिवस बंगळुरूला कधीही भेट न देऊ नये याबाबत माझी खात्री झाली आहे” हे वाचून दुसरा म्हणाला, कृपया येऊन नका. खरं तर येथे येणाऱ्या स्थलांतरितांना पुन्हा त्यांच्या गावी जाण्यासाठी तयार करा, असे झाले तर उत्तम.”
एकाने लिहिले, ” हे असे लोक आहेत ज्यांनी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम पॉलिसी रद्द केली. अशी दुःखद अवस्था आहे. त्यामुळे भारतातील लोकांमध्ये कामाची नैतिकता नाही असा आभास निर्माण होतो.
दुसरा म्हणाला, माझा एकच विचार आहे की कोणीतरी त्यांना ब्लूटूथ हेडफोन नावाच्या या अनोख्या आविष्काराची ओळख करून द्यावी.”
तिसरा म्हणाला, “हे काम फोनवर करता आले असते – दोन्ही – मिटिंग आणि बूट खरेदी देखील.”
चौथा म्हणाला की, ” हे दर्शवते की वर्क प्लेस आणि मॅनजेर आणि फाउंडर्स किती टॉक्सिक असू शकतात.”
हेही वाचा – “हाय गर्मी!”, कडक उन्हात तापलेल्या रस्त्यावर तरुणीने अंड्याचं बनवलं ऑम्लेट, Viral Video पाहून नेटकरी चक्रावले
पाचवा म्हणाला, “अलीकडे, बेंगळुरू सर्व चुकीच्या कारणांसाठी चर्चेत येत आहे.”
सहावा म्हणाला, “हे पिक बंगळुरू मुव्हमेंट कशी असू शकते? ही महिला स्पष्टपणे कारण आहे की कंपन्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत येण्यास आणि WFH पॉलिसी रद्द करण्यास सांगत आहेत. समस्या अशी आहे की, मीटिंगमध्ये १००% उपस्थित न राहता उपस्थित राहणे हे अजिबात उपस्थित न राहण्याइतकेच चांगले आहे.”
सातवा म्हणाला, ही अभिमानाची गोष्ट आहे की नाही याची खात्री नाही. आणि याचे औचित्य सिद्ध करण्यासाठी, काही इंडस्ट्री लिडर्स म्हणतील की वर्क-लाइफ बॅलन्स असे काहीही नाही!! त्या व्यक्तीने जास्त तास काम करावे..इ. हे थांबण्याची गरज आहे. सर्व माणसं आहेत, मशीन नाही.”