Snake Viral Video: सापाचं नाव जरी काढलं तरी अनेकांना घाम फुटतो. जंगलात, खेडेगावात दिसणारा साप हल्ली शहरी भागातपण दिसतो तसंच पावसाळ्यात तर सापांचा धोका अधिक वाढतो. अनेकदा आजूबाजूच्या परिसरात तर अनेकांच्या घरातही साप शिरतात. यातले काही साप विषारीदेखील असतात आणि त्यांनी दंश केला तर यामुळे जीवदेखील जाऊ शकतो. त्यामुळे भलीभली लोकं सापासारख्या या विषारी प्राण्याला घाबरतात आणि सापाचा विषय जरी निघाला की धुम ठोकून पळतात. पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एक चिमुकला सापाबरोबर अक्षरश: खेळताना दिसतोय.

सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या व्हायरल झालेला लहान मुलाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

सापाचा व्हायरल व्हिडीओ (Kid Playing with Snake Video)

लहान मुलाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो एक लहान मुलगा थेट सापाबरोबरच खेळतोय. चिमुकल्याच्या समोर भलामोठा साप असूनही तो तिथेच बसून त्याच्याशी मस्ती करताना दिसतोय. एवढंच नाही तर मस्ती करता करता तो सापाला तोंडात काय घेतोय त्याच्या जवळ काय जातोय. लहान मुलाचा हा पराक्रम पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @viral_india.official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तसंच “बाळा साप आहे तो थोडं तरी घाबर, मुलाची करामत पाहून सापालाही भरेल धडकी” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया (Snake Bite Video)

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “संपूर्ण साप समाज याला घाबरला आहे”, तर दुसऱ्याने “अरे जर तुला तो चावला तर तू राहणार नाहीस” अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करत लिहिलं, ”अरेरे, जीव जाईल त्याचा, त्याचे पालक कुठे आहेत”