Car Hits Bike On Highway Video Viral : महामार्गावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या अपघाताचे थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उत्तर प्रदेश-उत्तराखंडच्या मुझफ्फरनगर भुराहेरी येथील रस्त्यावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. दुचाकी चालक वाहतूकीचे नियम मोडून रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने त्याला धडक दिली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालकाने हेल्मेट न घालता महामार्गावर प्रवास केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

दुचाकीवरून रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगानं येणाऱ्या कारकडे न पाहिल्याने हा धक्कादायक अपघात घडाल. अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. घाईघाईत रस्ता ओलांडण्याच्या नादात दुचाकीली कारने जोरदार धडक दिली आणि हा अपघात घडला. कारची धडक इतकी भयानक होती की, चालक कारच्या रुफवर चेंडूसारखा उडाला. कारच्या धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाला असून चालकाचा जागीच मृ्त्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा – Video: रस्ता ओलांडणाऱ्या हत्तींच्या कळपाशी पंगा, IFS अधिकारी संतापले, यूजर्स म्हणाले, “तरुणांना लगेच अटक करा…”

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताचे थरारक दृष्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ @Prashant5616 नावाच्या यूजरने ट्वीटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “रस्त्यावरील अपघाताचा व्हिडीओ. स्कुटी चालक रस्ता क्रॉस करत असताना कारने धडक दिली. स्कुटी चालवणाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीय. उत्तरप्रदेश-उत्तराखंडच्या भूराहेडी येथील घटना.”