Pune rain viral video: राज्याच्या अनेक भागात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे तर घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहे. या जोरदार पावसामुळे प्रत्येक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला असून अनेक ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. अशातच पुण्यातही वादळी वारा आणि पावसानं थैमान घातलंय. याच दरम्यान पुण्यातला एक व्हिडीओ सध्या समोर आला असून व्हिडीओ पाहून धक्का बसेल.

पुण्यात वादळी वाऱ्यानं थैमान घातलंय. यावेळी वादळी वाऱ्यामुळे एक पत्रा हवेत उडाला. याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल. अनेक घरांचे पत्र या वादळात उडाले आहेत. त्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय. इतक्या वाऱ्याच्या वेगानं हा पत्रा हवेत उडाला की यामध्ये मोठा अपघाता झाला असता. पार्किंगच्या जागेत असणारा हा पत्रा असून या पत्र्याखाली मोठ्या संख्येनं गाड्या पार्क केलेल्या दिसत आहे. हा पत्रा उडून गाड्यांवर पडल्यामुळे गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही घराबाहेर पडताना आता शंभर वेळा विचार कराल.

पाहा व्हिडीओ

या एकूणच सध्याच्या परिस्थिती बाबत पुणे हवामान विभागाचे अधिकारी एस. डी. सानप यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, दरवर्षी मान्सूनचे ८ जूनला आगमन होते. यंदा मात्र मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे. केरळमध्ये देखील ८ जून अगोदरच आगमन झाले आहे. तर काल तळकोकणामध्ये मान्सून दाखल झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट तर पुणे शहराला येलो अलर्ट असणार असून पुढील पाच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होईल अशी शक्यता पुणे हवामान विभागाचे अधिकारी एस. डी. सानप यांनी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाचा कहर; पुण्यात यंदाच्या मे महिन्यात आतापर्यंत १९३ झाडे कोसळली!
पुण्यात शहर परिसरात गेल्या सुमारे २० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे १९३ झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. दर वर्षी पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटना घडतात. मात्र, या वर्षी आधीच पाऊस सुरू झाल्याने झाडे कोसळण्याच्या मे महिन्यातील सर्वाधिक घटना यंदा घडल्या.