सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात प्राण्यांशी संबंधित व्हिडीओचाही समावेश आहे. यातील काही व्हिडीओमध्ये प्राणी मजेशीर कृत्य करताना दिसतात, तर काहींमध्ये त्यांच्यात जोरदार भांडणही दिसून येता. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बैलांमध्ये ‘गँगवॉर’ पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये दोन बैल आपापसात भांडताना दिसत आहेत. तेव्हाच एक कुत्राही या भांडणात सामील होतो. त्यानंतर जे बघायला मिळतं ते तुम्ही आयुष्यात क्वचितच पाहिलं असेल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्ही नक्कीच हसालही.

नक्की काय झालं?

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कच्च्या रस्त्याच्या कडेला अचानक दोन बैल एकमेकांना भिडतात आणि जोरदार मारामारी करतात. यादरम्यान घोड्यावर बसलेली एक व्यक्ती ही लढत पाहत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बैल एकमेकांना कसे हरवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अचानक एक कुत्रा भांडणात सामील होतो. हे बघून एक बैल अतिशय चिडून जातो आणि तो कुत्र्याचा कान तोंडाने पकडून त्याला बाजूला फेकून देतो. दरम्यान, दुस-या बैलाला संधी मिळते आणि तो पांढऱ्या बैलाला शिंगाने मारतो. अशी मजेशीर झुंज तुम्ही क्वचितच पाहिली असेल, ज्यात बैलांमध्ये कुत्रा लढायला आला असेल.

(हे ही वाचा: ‘पुष्पा’मधील ‘सामी सामी’ गाण्यावर चक्क हत्तीने धरला ठेका!; Video Viral)

(हे ही वाचा: जंगलाचा राजा सिंहाची म्हशींनी केली दयनीय अवस्था! बघा Viral Video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

बैलांचा हा ‘गँगवॉर’चा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ir_geographic नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत ३० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी या व्हिइओला लाईकही केले आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की लोकांना हा व्हिडीओ किती आवडला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.