Sunil Gujar a soldier from Kolhapur: अवघ्या ५ महिन्यांचा वडिलांना पहिल्यांदा भेटण्याआधीच चिमुकल्या जीवाला वडिलांची शेवटची भेट घ्यावी लागली. देशाच्या सीमेचे रक्षण करताना शहीद झालेले जवान सुनील गुजर यांचे पार्थिव गावात दाखल होताच, एकच आक्रोश झाला. त्यांच्या आई-वडिलांनी, पत्नीने आणि नातेवाईकांनी टाहो फोडताच उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. ‘अमर रहे, अमर रहे, सुनिल गुजर अमर रहे’ या घोषणांनी आसमंत दुमदुमला. कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होताच शिवाय पितृछत्र हरपलेल्या पाच महिन्यांच्या रियांशकडे पाहताना उपस्थितांना गहिवरून आले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

बाप-लेकाची भेट अखेर अधुरीच राहिली

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शहीद जवान सुनील विठ्ठल गुजर हे कर्तव्यावर असताना त्यांच्या पत्नीला पुत्ररत्न झाला होता. यावेळी सुनील कर्तव्यावर असल्यामुळे आपल्या मुलाला भेटण्यासाठी येता आलं नाही मात्र आता या अपघातानंतर बाप-लेकाची भेट अखेर अधुरीच राहिली. अवघ्या ५ महिन्याच्या बाळाला आपल्या वडिलांची पहिली आणि शेवटची भेट घ्यावी लागली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अखेरचं वडिलांचं दर्शन घेताना हे बाळ वडिलांच्या चेहऱ्याला स्पर्श करत आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थिताच्या अश्रूला बांध फुटला.

भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना कोल्हापुरातील शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फे मलकापूर येथील जवानास वीरमरण आले. सुनील विठ्ठल गुजर ( वय २७) असे या हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे.सुनील गुजर हे सन २०१९ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. पुणे येथे बॉम्बे इंजिनीयरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून मणिपूर येथे बॉम्बे इंजीनियरिंग रेजिमेंटमध्ये सेवा बजावत होते. मणिपूर येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्यदलाचे वाहन ८०० फूट खोल दरीत कोसळल्याने अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला.अरूणाचल येथे भूस्खलन झालेल्या ठिकाणी डोझरच्या सहाय्याने मलबा हटवला जात होता. या डोझरवर चालक म्हणून सुनील कर्तव्यावर होते. दरम्यान डोझर घसरून खोल दरीत कोसल्याने सुनील यांना वीरमरण आले होते.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by विजू भाऊ (@viju.bhaau)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहीद झालेले जवान सुनील विठ्ठल गुजर (वय २५) यांना त्यांच्या मुळ गावी शित्तुर तर्फ मलकापुर येथे शासकीय इतमामात मानवंदना देत हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रूपुर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.