scorecardresearch

Swiggy च्या कंडोम डिलिव्हरीच्या ट्वीटला ड्युरेक्स इंडियाने दिला भन्नाट रिप्लाय, नेटकरी म्हणाला, “१४ फेब्रुवारीला मोठी लाट…”

स्विगीने कंडोम डिलिव्हरीचं ट्वीट केल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला.

Swiggy च्या कंडोम डिलिव्हरीच्या ट्वीटला ड्युरेक्स इंडियाने दिला भन्नाट रिप्लाय, नेटकरी म्हणाला, “१४ फेब्रुवारीला मोठी लाट…”
स्विगीने कंडोम डिलिव्हरीचं भन्नाट ट्विट केलंय. (Image-Graphics Team)

Swiggy condom delivery tweet viral news: थर्टी फर्स्टच्या रात्री धमाल केल्यानंतर नवीन वर्षात नवे संकप्ल घेऊन अनेकांचा प्रवासाला सुरुवात झालीय. पण नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला सोशल मीडियावर नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. लोकांनी फोटो, व्हिडीओ पोस्ट करून २०२२ मधील सुंदर आठवणींना उजाळा दिला. पण नवीन वर्ष सुरु होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला, तो फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीच्या एका ट्वीटने. मोठ्या प्रमाणात कंडोम विक्री झाल्याचं एक भन्नाट ट्वीट स्विगीने थर्टी फर्स्टच्या रात्री केलं होतं. या ट्वीटमध्ये स्विगीने त्यांच्या ग्रोसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी इन्स्टामार्टसह ड्युरेक्स इंडियालाही टॅग केलं होतं. त्यामुळे स्विगीच्या ट्वीटला ड्युरेक्स इंडिया कंपनीनेही मजेशीर उत्तर दिलं.

स्विगीच्या कंडोम डिलिव्हरीच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

स्विगीने कंडोमच्या डिलिव्हरीबाबत ट्वीट करत म्हटलं, स्विगी इन्स्टामार्टने आतापर्यंत ड्युरेक्स इंडियाचे २७५७ पॅकेट्स डिलिव्हर केले. ६९६९ होण्यासाठी कृपया ४२१२ वर कृपया ऑर्डर करा. जेणेकरून आपण सर्वजण ‘छान’ असं म्हणू शकतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वत:च्या ट्वीटला रिप्लाय करून एक स्क्रीनशॉट शेअर केला. त्याला स्विगीने ‘छान’ असं कॅप्शन दिलं. या ट्वीटवर मजेशीर रिप्लाय देत ड्युरेक्स इंडियाने ट्वीट करत म्हटलं, “त्यांना डिलिव्हर केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला माहितेय कमीत कमी २७५७ जणांसाठी नवीन वर्ष धमाकेदार असेल.” तसेच त्यांच्या या ट्विटला स्विगी इन्स्टामार्टने रिप्लाय करत कॅप्शन दिलं, “ज्या लोकांनी २७५७ कंडोम्स ऑर्डर केले, ते कदाचित हे वाचन नसतील.”

नक्की वाचा – धक्कादायक! पहिल्यांदाच दारु प्यायला अन् तरुणाचा मृत्यू झाला, पार्टीत नेमकं काय घडलं?

इथे पाह ट्वीट

स्विगीने ३१ डिसेंबरला ट्विट केल्यापासून आतापर्यंत ४.३ लाखांहून अधिक व्यूज मिळाले असून ८ हजारहून अधिक जणांनी या ट्विटला लाईक केलं आहे. तसंच या ट्विटवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं, तुम्ही सिंगल असणाऱ्यांसाठी थोडी सहानुभूती दाखवू शकता का? तर दुसरा नेटकरी प्रतिक्रिया देत म्हणाला, “वेगवान डिलिव्हरी केल्याबद्दल तुमचे आभार.” तर अन्य एक नेटकरी खिल्ली उडवत म्हणाला, “मिशन 6969”. १४ फेब्रुवारीला डिलिव्हरीजची दुसरी मोठी लाट येत आहे, तुम्ही तयार आहेत का? असा प्रश्नही एका नेटकऱ्याने उपस्थीत केला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 18:36 IST

संबंधित बातम्या