T20 World Cup SA vs NED: टी २० विश्वचषकात सर्वच सामन्यांमध्ये अनपेक्षित खेळ पाहायला मिळाले आहेत. आज सुपर १२ सामन्यातील दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड सामन्यात संपूर्ण विश्वचषकात दुबळ्या ठरलेल्या नेदरलँडच्या संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आहे. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेवर १३ धावांनी विजय मिळवला आहे. यानंतर मराठी लेखक व अभिनेता हृषीकेश जोशी यांनी भन्नाट फेसबुक पोस्ट केली आहे. नेदरलँडच्या अभूतपूर्व यशाचं कौतुक करताना तुम्ही आज जगाला दाखवून दिलं असं म्हणून ह्रिषीकेश जोशी यांनी असंही लिहिलं आहे, यावेळी जोशींनी नेदरलँडच्या यशाचं जे काही कारण सांगितलं ते पाहून कमेंट बॉक्समध्ये हशा पिकला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

SA vs NED हायलाईट्स

दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड सामन्यात आज सुरुवातीला नेदरलँडने फलंदाजी करून १५८ धावा केल्या होत्या. नेदर्लंडच्या कॉलिनने ४१ धावांची नाबाद खेळी खेळली. तर स्टिफन मायबर्ग व टॉम कूपर यांनी अनुक्रमे ३७ व ३५ धावा केल्या आहेत. आफ्रिकेच्या केशव महाराज या गोलंदाजाने २ विकेट घेतल्या मात्र आज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची जादू दिसली नाही. १५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँडच्या गोलंदाजीचा फटका दक्षिण आफ्रिकेला बसला. दक्षिण आफ्रिकेने वेळोवेळी विकेट्स गमावल्या.

काय म्हणाले ह्रिषीकेश जोशी?

नेदरलँड्स…

दुग्धजन्य पदार्थांसाठी ओळख आहे म्हणून एवढं दूध का दूध पानी का पानी करावं? ‘चीज’ कसं करावं हे जगाला आज दाखवून दिलं राव तुम्ही!

T20 World Cup Finals मध्ये IND vs PAK रंगणार… फक्त येत्या सामन्यात ‘हे’ समीकरण जुळायला हवं

दरम्यान, आज नेदरलँडच्या विजयाने भारताचा टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे. नेदरलँड सुपर १२ च्या ग्रुप २ पॉईंट टेबलमध्ये सर्वात कमी पॉईंटसह शेवटच्या स्थानी होता. पण नेदरलँडच्या संघाने आज बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आहे. नेदरलँडच्या विजयाने पाकिस्तानच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. जर आज बांग्लादेश विरुद्ध सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आला तर दक्षिण आफ्रिकेच्या ऐवजी पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup sa vs ned highlights marathi writer hrishikesh joshi post viral match updates wc point table svs
First published on: 06-11-2022 at 10:58 IST