Tea Seller Viral Video : भारतीयांना चहाचं किती वेड आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही, देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला अनेक चहाप्रेमी पाहायला मिळतील, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक नाक्यावर, ऑफिसेसबाहेर एकतरी चहाची टपरी पाहायला मिळते. पण, सगळ्याच ठिकाणचा चहा आपल्याला आवडतो असे नाही. काही मोजकेच चहा विक्रेते असतात, ज्यांच्याकडील चहाची चव आपल्या नेहमी लक्षात राहते. पण, अनेक चहा विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधून काढतात. सध्या अशाच एका चहा विक्रेत्याचा अनोखा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमधील चहा विक्रेता चक्क प्राणी पक्षांचे आवाज काढून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करताना दिसतोय. व्हिडीओमधील हा चहा विक्रेता विविध पक्षांच्या आवाजाची नक्कल करत ग्राहकांना आपल्या चहाची खासियत सांगतोय. हा विक्रेता लेमन टी विकत असल्याचे दिसतेय.

चहा विक्रेत्याचे टॅलेंट पाहून भारावले लोक

विक्रेता ग्राहकांना बोलण्यासाठी त्याच्या अद्वितीय कौशल्याचा वापर करतोय. तो प्रत्येक पक्ष्याचा आवाज इतक्या स्पष्टतेने काढतो की, जो ऐकून कोणीही थक्क होईल. तिथे उपस्थित लोकही चहा विक्रेत्याचे टॅलेंट पाहून भारावून गेले. यावेळी अनेकांनी व्हिडीओ रेकॉर्डिंगही सुरू केले.

हा अनोखा व्हिडीओ akhileshwar.shukla.3 नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंटही केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी प्राणी पक्षांच्या आवाजाची नक्कल करणाऱ्या चहा विक्रेत्याच्या टॅलेंटचे कौतुक केलं आहे.

VIDEO : बाई असं वागणं बरं नव्हं! भरवर्गात शिक्षिका डाराडूर झोपली अन् विद्यार्थ्यांनी काय केलं पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने म्हटले की, “याला म्हणतात हिडन टॅलेंट.” दुसऱ्या युजरने म्हटलेय की, “भावाने संपूर्ण जंगलाला जागं केलं.” तिसऱ्या युजरने म्हटलेय की, “एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी काय करेल सांगू शकत नाही?” शेवटी एकाने लिहिले की, “काकांनी चुकीचा व्हॉईस पॅक डाउनलोड केला आहे असे दिसतेय.” पण, तुम्हाला या चहा विक्रेत्याचे टॅलेंट कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.