टीम इंडियाने वर्ल्ड कप २०२३ साठी आपला नवा ट्रेनिंग किट जाहीर केला आहे. खेळाडूंना हा नवा ड्रेस ५ ऑक्टोबर रोजी मिळाला. मात्र, ड्रेसमध्ये खेळाडूंना पाहून सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे. यजमान संघ रविवारी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया संघाशी भिडणार आहे. पण, महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच ट्रेनिंगच्या ड्रेस निवडीवरून क्रिकेट बोर्डाला खूप वाईट प्रकारे ट्रोल केले जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये टीम इंडियाचे खेळाडू भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. भगव्या रंगाच्या जर्सीमधील खेळाडूंना पाहून आता युजर्स म्हणत आहेत की, हे टीम इंडियाचे खेळाडू आहेत की, ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप स्विगीचे डिलिव्हरी बॉइज. अशा प्रकारे खेळाडूंच्या नव्या ट्रेनिंग किटची लोक खिल्ली उडवत आहेत.
२०१९ मध्येही टीम इंडियाचे खेळाडू भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसले. निवडकर्त्यांनी हा रंग इंग्लंडपेक्षा वेगळा दिसण्यासाठी निवडला होता. कारण- इंग्लंडचा संघही निळ्या रंगाची जर्सी घालतो. भगवा रंग ताकद आणि तग धरण्याची क्षमता दर्शवतो. त्यामुळे हजारो लोक टीम इंडियाच्या नवीन जर्सीे समर्थन करीत आहेत.
पण सोशल मीडियावर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांना टीम इंडियाचा नवा ड्रेस आवडला; तर काही लोक त्याची खिल्ली उडवत आहेत. काही लोक म्हणत आहेत की, हा ‘स्विगी’च्या डिलिव्हरी बॉयचा ड्रेस वाटतोय.
एका युजरने लिहिलेय, ‘टीम इंडिया आहे की स्विगी डिलिव्हरी बॉय? ते आयसीटी खेळाडू आहेत की नाही हे पाहण्यासाठी दोनदा फोटो पाहावा लागला. काही युजर्सनी लिहिले की, चला, यावेळी रिहर्सल ड्रेस ‘स्विगी’ने बनवला आहे, किती छान आयडिया आहे.