सध्याच्या डिजीटल जमान्यात लोकांचे जीवन खूप सोपे आणि सुखकर झाले आहे. लोक घरात बसून आपल्या गरजा पूर्ण करतात. एका क्लिकवर ते पाहिजे ती गोष्ट ऑर्डर करतात. मग त्यामध्ये कधी खाद्यपदार्थ तर कधी घरगुती वस्तूंचा समावेश असतो. त्यामुळे दुकानात जाऊन खरेदी करायचा अनेकजण विचारही करत नाहीत. पण ऑनलाईन ऑर्डर करताना अनेकदा फसवणूकीच्या घटनाही घडतात. अनेकदा तर आपण मागविलेल्या ऑर्डर आणि आपल्याला मिळालेली ऑर्डर पुर्णपणे वेगवेगळी असते. याबाबतच्या बातम्या आपण सोशल मीडियावर पाहत असतो.

सध्या अशीच एक घटना उघडीस आली आहे, ज्यामध्ये एका तरुणाला मोबाईलऐवजी चक्क दोन दगड मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीने अॅमेझॉन कंपनीकडून स्वत:साठी आयफोन ऑर्डर केला होता. पण ज्यावेळी ऑर्डर देण्यासाठी अॅमेझॉनचा डिलीव्हरी बॉय आला, त्यावेळी या तरुणाने उत्साहात ऑर्डर अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करायला सुरुवात केली. त्याने ते बॉक्स ऑपन केल्यानंतर त्याला आयफोनच्या बॉक्समध्ये चक्क दगडाचे दोन तुकडे मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांना हा व्हिडीओ पाहून आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे.

हेही पाहा- आजोबांचा रस्ते अपघातात मृत्यू, लोकांचा जीव वाचवण्यासाठी नातीचा अनोखा उपक्रम; Video पाहून तुम्हीही कौतुक कराल

हेही पाहा- अजमेरच्या यात्रेतील धक्कादायक दुर्घटनेचा Video व्हायरल, ५० फुटांवरून पाळणा कोसळला अन्…

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आयफोनची आलेली ऑर्डर अनबॉक्सिंग करताना दिसत आहे. तो ती ऑर्डर अगदी उत्साहात अनबॉक्सिंग करायला जातो आणि बॉक्समधील एक कव्हर काढताच त्याला मोठा धक्का बसतो. कारण त्या तरुणाला फोनऐवजी बॉक्समध्ये दोन दगड मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी थक्क झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@scribe_prashant नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, या व्यक्तीने अॅमेझॉनवरून आयफोन ऑर्डर केला. तो घेण्यासाठी तो उत्सुक होता. त्याने मोबाईल घेतानाचा व्हिडिओ शूट केला, पण त्याने ज्या आयफोनसाठी पैसे दिले त्याऐवजी त्याला फक्त दगड मिळाले. ही घटना पश्चिम बंगालमधील आहे. व्हिडिओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे, “हा खूप खतरनाक व्हिडिओ आहे, बिचाऱ्यासोबत धोका झाला.”तर अनेकांनी ऑनलाईन ऑर्डरमध्ये अशा फसवणूक होतात असं म्हटलं आहे.